मूळक्षेत्र मेतकेत शुक्रवारपासून बाळूमामांचा पुण्यतिथी उत्सव

मूळक्षेत्र मेतकेत शुक्रवारपासून बाळूमामांचा पुण्यतिथी उत्सव

मेतके (प्रतिनिधी) : सद्गुरू बाळूमामा यांचे मूळ क्षेत्र म्हणून ख्याती असलेल्या कागल तालुक्यातील मेतके येथे शुक्रवार दि. १६ ते २३ ऑगस्टदरम्यान बाळूमामा यांचा ५८ वा पुण्यतिथी उत्सव आयोजित केला आहे. या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे.

या सप्ताहामध्ये काकड आरती, सकाळी ७ ते १ ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ४ ते सायंकाळी ५.३० हरिपाठ, ६ ते ७ प्रवचन, ७ ते ७.२० मामांची आरती, रात्री ७.३० ते ९.३० कीर्तन, त्यानंतर महाप्रसाद व हरिजागर भजन सेवा असेल.

उत्सवामध्ये १६ रोजी ह. भ. प. बळीराम तांबेकर-जैन्याळ, दि. १७ रोजी उदयशास्त्री- गोटखिंडी, दि. १८ रोजी नारायण एकल जोगेवाडी, दि. १९ रोजी एकनाथ गुरव-मळगे बुद्रुक यांचे प्रवचन व कीर्तन होईल. दि. २० रोजी एम. पी. पाटील- कावणे यांचे प्रवचन व डॉ. शिवाजी पन्हाळकर-उत्तूर यांचे कीर्तन, दि. २१ रोजी आबासाहेब देसाई- कोल्हापूर यांचे प्रवचन व मधुकर पाटील-कावणे यांचे कीर्तन, दि. २२ रोजी शशिकांत गुरव, चौंडाळ यांचे प्रवचन व कीर्तन होईल. याच दिवशी रात्री १२.३० मिनिटांनी 'श्रीं'च्या चरणी पुष्पवृष्टी होऊन मामांचा पुण्यतिथी उत्सव होईल. दररोज रात्री विविध गावांच्या भजनी मंडळांचा जागर होईल. दि. २३ रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत शशिकांत गुरव यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसाद होईल.

या उत्सवासाठी व ज्ञानेश्वरी पारायण यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सद्‌गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.