रोहितने विजयानंतर असे काही केले की ज्याने धोनीची आठवण झाली, विजयानंतरही धोनीला विसरला नाही

रोहितने विजयानंतर असे काही केले की ज्याने धोनीची आठवण झाली, विजयानंतरही धोनीला विसरला नाही

दुबई : भारताने बलाढ्य न्यूजीलंड संघाला नमवत  चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. यानंतर रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली. पण या विजयानंतरही रोहित शर्मा हा धोनीला विसरला नाही. कारण या विजयानंतर रोहित शर्माने असे काही कृत्य केले की ज्याने भारताचा माजी कर्णधार धोनीची आठवण झाली. 

भारताला पहिली चॅम्पियन्स ट्रॉफी महेंद्रसिंग धोनीने जिंकवून दिली होती. त्यानंतर रोहित शर्माने यावेळी भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून दिली. धोनी हा संघातील युवा खेळाडूंना प्राधान्य द्यायचा. रोहित शर्मानेही हीच गोष्ट केली. एखाद्या विजयानंतर धोनी संघातील युवा आणि मॅचविनर खेळाडूच्या हाती ट्रॉफी सुपूर्द करायचा आणि हीच गोष्ट रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यावर केल्याचे पाहायला मिळाले.

आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांच्या हस्ते रोहितने  आयसीसीची ट्रॉफी स्विकारली. त्यानंतर रोहित भारतीय संघातील खेळाडूंजवळ आला आणि मधोमध उभा राहीला. त्यानंतर रोहित शर्मासह भारतीय संघाने जोरदार सेलिब्रेशन केले. पण त्यानंतर हार्दिक पंड्याने रोहित शर्माच्या हातून ट्रॉफी घेतली आणि तो सेलिब्रेशन करायला लागला. पण त्यानंतर रोहित शर्मा भारताच्या विजयातील मॅचविनरला विसरला नाही. रोहित शर्माने काही काळाने ही ट्रॉफी कुलदीप यादवला घेण्यास सांगितली. कारण कुलदीप यादव या सामन्याचा मॅचविनर असल्याचे पाहायला मिळाले. कुलदीप यादवने जर राचिन रवींद्र आणि केन विल्यम्सन यांना बाद केले नसते तर भारताला हा विजय मिळवता आला नसता. त्यामुळे रोहित शर्माने ट्रॉफी जिंकल्यावर ती कुलदीप यादवच्या हातात नेमकी कशी जाईल, याची चोख व्यवस्था केल्याचे पाहायला मिळाले. 

रोहित शर्माने यावेळी धोनीसारखेच जो खेळाडू मॅचविनर आहे, त्याला श्रेय दिल्याचे पाहायला मिळाले. रोहित शर्माने या एका गोष्टीने सर्वांची मनं जिंकल्याचे पाहायला मिळाले. रोहित शर्माच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ यावेळी चांगलाच व्हायरल झाला आहे.