HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

ग्लोबल आडगाव' चित्रपटाला राज्य शासनाच्या पुरस्काराची चार नामांकने जाहीर

ग्लोबल आडगाव' चित्रपटाला राज्य शासनाच्या पुरस्काराची चार नामांकने जाहीर

माझा महाराष्ट्र ऑनलाईन : प्रसिद्ध उद्योजक व सर्जशील चित्रपट निर्माते म्हणून सुपरिचित असलेले मनोज कदम यांनी निर्मिती केलेल्या ग्लोबल आडगाव चित्रपटाला महाराष्ट्र राज्य शासनाच्या सन २०२२ च्या ६० व्या चित्रपट पुरस्कारासाठीच्या नामांकनांची सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी घोषणा केली. मराठवाड्याच्या मातीतील निर्मिती असलेला बहुचर्चित 'ग्लोबल आडगाव' या चित्रपटात चार नामांकने मिळाली आहेत. विशेष म्हणजे, 'ग्लोबल आडगाव' चित्रपटाला एकूण चार नामांकने मिळाल्याने चित्रपटसृष्टीच्या इतिहासात मराठवाड्याला पहिल्यांदाच मोठा बहुमान मिळाला आहे.

यावेळी निर्माते मनोज कदम बोलताना म्हणाले की ग्लोबल आडगाव' या सिनेमांमधून शेती, माती, ग्रामसंस्कृती त्याचबरोबर ग्लोबलायझेशनच्या विळख्यात अडकलेला शेतकरी, ग्लोबलायझेशन मुळे शेतीचे झालेले नुकसान अशा महत्त्वाच्या विषयावर या सिनेमाच्या माध्यमातून भाष्य करण्यात आलेले आहे. अशी आहेत नामांकने: सर्वोत्कृष्ट चित्रपट (ग्लोबल आडगाव), सर्वोत्कृष्ट कथा - अनिलकुमार साळवे, उत्कृष्ट गीते, प्रशांत मडपूवार, उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता रोनक लांडगे अशा चार विभागात ग्लोबल आडगाव चित्रपटास नामांकने मिळाली आहेत.

यापूर्वी ग्लोबल आडगाव या मनोज कदम निर्मित, अमृत मराठे सहनिर्मित आणि अनिलकुमार साळवे लिखित-दिग्दर्शित मराठी चित्रपटास अनेक सन्मान प्राप्त झालेले आहेत. या चित्रपटात सयाजी शिंदे, उषा नाडकर्णी, उपेंद्र लिमये, अनिल नगरकर, रौनक लांडगे, सिद्धी काळे, अशोक कानगुडे अशा अनेक कलाकारांनी काम केले आहे. 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.