HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

लोकप्रिय कामांपेक्षा लोकहिताच्या कामाला प्राधान्य - समरजितसिंह घाटगे

लोकप्रिय कामांपेक्षा लोकहिताच्या कामाला प्राधान्य - समरजितसिंह घाटगे

कोल्हापूर -  स्व.विक्रमसिंह घाटगे यांच्या संस्काराप्रमाणे लोकप्रिय कामांपेक्षा लोकहिताच्या कामाला प्राधान्य दिले असून यापुढेही ते देत राहू असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.

 

सावर्डे बुद्रुक (ता.कागल)येथे घाटगे यांच्या प्रयत्नातून प्रादेशिक पर्यटन योजनेतील एक कोटी रुपयांच्या मंजूर निधीतील ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिर परिसर सुशोभीकरण व सुसज्ज सांस्कृतिक सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी सरपंच व 'शाहू'च्या संचालिका रेखाताई पाटील होत्या.

घाटगे पुढे म्हणाले, लोकप्रिय कामांमुळे तात्पुरते समाधान मिळते.परंतू लोकहिताची कामे पिढ्यानपिढ्या लोकांना उपयुक्त ठरतात. स्वर्गीय राजेसाहेब यांनी लोकप्रिय कामांपेक्षा लोकहिताच्या कामाला प्राधान्य दिले. कार्यकर्त्यांवरही तसे संस्कार केले.त्यांचे कार्य व विचार दीपस्तंभासारखे असल्यामुळे आम्ही त्यांचे अनुकरण करीत आहोत.

माजी सरपंच रघुनाथ शिरसे म्हणाले, कोणतीही सत्ता नसताना समरजितसिंह घाटगे यांनी विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला. गटतट न पाहता विकास कामासाठी निधी देणाऱ्या या नेतृत्वाची आमदारकीची यावेळी हुकलेली संधी पुढील वेळी त्यांना निश्चितपणे मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी यावेळीपेक्षा मोठ्या ताकतीने जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे राहील. यावेळी माजी सरपंच प्रताप पाटील व तानाजी हिरुगडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास माजी सरपंच छायाताई हिरुगडे, महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय हिरुगडे, हभप बाबुराव पाटील, संदेश पाटील, संभाजी फराकटे, राजश्री चिंदगे, संतोष हिरुगडे, रणजीत हिरुगडे, राहूल चौगले आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.