विधानसभा अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात,फक्त 6 दिवसांचा वेळ!

विधानसभा अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात,फक्त 6 दिवसांचा वेळ!

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी फक्त सहा दिवसांचा अवधी मिळणार आहे, 29 ऑक्टोबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, उमेदवारांनी पहिल्याच दिवसापासून अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी करण्याची शक्यता आहे.

निवडणूक यंत्रणा राज्यभरात सज्ज झाली असून, सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे पक्षातील नेते आणि अपक्ष उमेदवारांची आजपासूनच अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याच्या मर्यादित कालावधीमुळे सगळ्या पक्षांमध्ये स्पर्धा वाढली आहे, आणि प्रत्येक मतदारसंघात राजकीय वातावरण तापू लागले आहे.