वेळीच उपचार न मिळाल्याने चिमुकलीचं निधन
कोल्हापूर (प्रतिनिधि) :बोहिरवाडी येथिल ४ वर्षाची चिमुकली अफरोज शेख हि तीच्या आई वडिलांसोबत घरी झोपलेली असताना झोपेत रात्री १२.३० वाजता सर्प दंश झाला.प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले, त्या ठिकाणी कोणीही डॉक्टर नव्हते. नंतर तिचा मृत्यू झाला. याच घटनेबाबत आज पुणे येथे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन संबंधित प्रथम आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्यावर निलंबन करून सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी रुग्ण हक्क संघर्ष समिती पुणे च्या वतीने निवेदन देऊन निषेध करण्यात आला.
दि २९/०७/२४ रोजी मौ बोहिरवाडी येथिल ४ वर्षाची चिमुकली अफरोज शेख हि तीच्या आई वडिलांसोबत घरी झोपलेली असताना झोपेत रात्री १२.३० वाजता सर्पदंश झाला कारणाने तीला नातेवाईकांनी ओतुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले असता तेथे ना डॉक्टर ना निवासी डॉक्टर ना प्राथमिक आरोग्य अधिकारी कुठलेही कर्मचारी उपलब्ध नव्हते २० मिनिटं तेथे आरडाओरडा केल्यानंतर तेथील नर्स ने आरोग्य केंद्राचे दार उघडले पण् तेथे कोणीही डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांना नारायणगांव अथवा जुन्नर येथील हाॅस्पिटलला जाण्यास सांगितले तेथुन निघून १० किलोमीटर अंतरावर गेल्यावर त्या चिमुकला जीव मालावला... खेड्यापाड्यातील वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या साठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन केली पण् त्याची निष्क्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वार्थापोटी दुरावस्था तेथे कुठलेही खाजगी हाॅस्पिटल नसतात ना तर डॉक्टर .सध्या स्थितीला पगार शासनाची व काम मात्र यांच्या वा नातेवाईकांच्या खाजगी हाॅस्पिटल मध्ये यांचा जास्त रस असतो फक्त हे आपली उपस्थिती दाखवण्यापुरतेच हाजरी लावण्यासाठी दवाखान्यात येतात, याला सर्वस्वी तालुका आरोग्य अधिकारी व त्या ठिकाणचे प्राथमिक आरोग्य अधिकारी निवासी डॉक्टर जबाबदार आहेत पण् यांची कातडी वाचवण्यासाठी साठी तात्पुरते कंत्राटी डाॅक्टरवर कारवाई करण्यात आली. रुग्ण हक्क संघर्ष समिती पुणे च्या वतीने त्या घटनेला तालुका आरोग्य अधिकारी व निवासी डॉक्टर हे पण् या घटनेला जबाबदार आहेत त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली पाहिजे.
अन्यथा रुग्ण हक्क संघर्ष समिती पुणे च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या वेळी रुग्ण हक्क संघर्ष समिती संस्थापक प्रमुख ॲड विजयभाऊ पंडित, शहराध्यक्ष संजय बावळेकर, संघटक किरण बडे, महिला प्रमुख गायत्री ढेबे, सचिव कल्पना जाधव, राहुल ताटे, शहर संघटक शषांक घाडगे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.