शक्तिपीठ महामार्गाचा विरोधासाठी उद्या पुणे बेंगलोर महामार्ग रोको आंदोलन ; वाहतूक व्यवस्था 'या' प्रमाणे

कोल्हापूर (प्रतिनिधी) - राष्ट्रीय महामार्गावर इंडीया आघाडी, सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी, शिक्षक संघटना, यासह विविध संघटनांचे वतीने शक्तिपीठ महामार्गाचा विरोध करणेकरीता पुणे बेंगलोर महामार्ग रोको आयोजन केले आहे. ०१ जुलै रोजी राष्ट्रीय महामार्ग रोको व चक्का जाम आंदोलन होणार असलेने सदर आयोजित केलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील चक्का जाम आंदोलन दरम्यान नागरीकांची, वाहनधारकांची गैरसोय होऊ नये, वाहतुकीची कोंडी होऊ नये. सामान्य जनतेस नियमित व्यवहार पार पाडण्यास अडसर निर्माण होऊ नये याकरीता रहदारी नियमन करणे आवश्यक असलेने पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी मोटार वाहतुकीसाठी प्रवेश बंद केले व वळविण्यात आले आहे.
मोटार वाहतुकीसाठी प्रवेश बंद केलेले व वळविणेत आलेले मार्ग :-
- कागल, लक्ष्मी टेकडी, तावडे हॉटेल, सांगली फाटा मार्गे पुणे कडे जाणा-या जड-अवजड वाहनांना लक्ष्मी टेकडी येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदर वाहनांनी लक्ष्मी टेकडी, फाईव्ह स्टार एमआयडीसी, हुपरी, इचलकरंजी, हातकणंगले, वडगांव, वाठार ब्रिज मार्गे राष्ट्रीय महामार्गावरुन पुढे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे.
- कागल, लक्ष्मी टेकडी, तावडे हॉटेल, सांगली फाटा मार्गे पुणे कडे जाणा-या जड-अवजड व सर्व वाहनांना उजळाईवाडी ओव्हरब्रिज खाली प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदर वाहनांनी शाहु टोल नाका, हायवे कॅन्टीन चौक, ताराराणी चौक, पोलीस अधीक्षक कार्यालय चौक, कसबा बावडा, शिये फाटा मार्गे राष्ट्रीय महामार्गावरुन पुढे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे.
- किणी टोल नाका-वाठार फाट, टोप, सांगली फाटा मार्गे सांगली कडे जाणा-या जड-अवजड व सर्व वाहनांना वाठार ब्रिज (शेर-ए-पंजाब धाबा) येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदर वाहनांनी वाठार ब्रिज, वडगांव, हातकणंगले मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे.
- किणी टोल नाका-वाठार फाट, टोप, सांगली फाटा मार्गे कागल कडे जाणा-या जड-अवजड व सर्व वाहनांना शिये फाटा (हॉटेल धनराज समोर) येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदर वाहनांनी शिये फाटा, कसबा बावडा, पोलीस अधीक्षक कार्यालय चौक, ताराराणी चौक, कोयास्को चौक, उंचगांव ब्रिज अगर सरनोबत वाडी ब्रिज अगर शाहु टोल नाका मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे.
- गांधीनगर कडुन तावडे हॉटेल ब्रिज खालुन सांगली फाटयाकडे जाणा-या सर्व वाहनांना तावडे हॉटेल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदर वाहनांनी ताराराणी चौक, पोलीस अधीक्षक कार्यालय चौक, कसबा बावडा, शिये फाटा मार्गे राष्ट्रीय महामार्गावरुन पुढे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे.
- सांगली फाटयाकडुन कडुन तावडे हॉटेल कडे जाणा-या सर्व वाहनांना सांगली फाटा ब्रिज खाली प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदर वाहनांनी शिरोली एमआयडीसी, कसबा बावडा, पोलीस अधीक्षक कार्यालय चौक, ताराराणी चौक मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे.
- सांगली, हातकणंगले, सांगली फाटा मार्गे राष्ट्रीय महामार्गावरुन कागल बेळगांव कडे जाणा-या सर्व वाहनांना इचलकरंजी फाटा हॉटेल कॅसल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदर वाहनांनी इचलकरंजी फाटा, कबनूर मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे.
- सांगली, हातकणंगले, सांगली फाटा मार्गे राष्ट्रीय महामार्गावरुन पुणे कडे जाणा-या सर्व वाहनांना हातकणंगले एस.टी. स्टॅन्ड समोर येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदर वाहनांनी हातकणंगले, वडगांव, वाठार ब्रिज मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे.
वरील निर्देश हे ०१जुलै रोजी सकाळी ०८.०० वा. अगर चक्का जाम, महामार्ग रोको आंदोलन सुरु झालेपासुन ते चक्का जाम आंदोलन संपेपर्यंत देण्यात येत आहेत.