शरद कृषीची विद्यार्थिनी अश्विनी खरात आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्यामध्ये प्रथम

शरद कृषीची  विद्यार्थिनी अश्विनी खरात आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्यामध्ये प्रथम

जैनापूर (प्रतिनिधी) : जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयामधील विद्यार्थिनी अश्विनी खरात हिने इंद्रधनुष्य २०२४ या युवक महोत्सव स्पर्धेसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरीच्या संघात निवड झाली होती.

राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य स्पर्धा या डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, आकोला येथे दिनांक ७ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत पार पडल्या. यामध्ये युवक महोत्सव इंद्रधनुष्य स्पर्धेमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या संघाने एकांकिका स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला असून शरद कृषी महाविद्यालयाची अश्विनी खरात या विद्यार्थ्यानीचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. ह्या यशाबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठ कुलगुरू डॉ. प्रशांत कुमार पाटील, विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चौव्हाण यांनी अभिनंदन केले. तसेच संस्थेचे चेअरमन आमदार डॉ.राजेंद्र पाटील (यड्रावकर), एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. प्राचार्य डॉ. सारिका कोळी, उपप्राचार्य प्रा. संजय फलके, सांस्कृती विभाग प्रमुख प्रा. सचिन तोडकर व क्रीडा शिक्षक प्रा. दादासाहेब मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले.