शिवसेना पक्षाच्या वतीने पूरग्रस्त लोकांना गरजू वस्तूंचे वाटप
कोल्हापूर (प्रतिनिधि) : शहरातल्या आणि आसपासच्या पूर परिस्थिती मुळे अनेक लोकांनी निवारा केंद्रात आसरा घेतले आहेत.शहरातल्या अनेक संस्था आणि लोक पूरग्रस्त लोकांसाठी अन्न पाणी कपडे पुरवत आहेत.
अशावेळी शिवसेना महिला आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यावतीने मदतीचा हात दिला. यासाठी रश्मी ठाकरे, उपनेते विशाखा राऊत , किशोरी पेडणेकर, उपनेते सुषमा अंधारे,कोल्हापूर संपर्क संघटिका श्रद्धा जाधव, उपनेते ज्योती ठाकरे ,संजना घाडी, शितल शेट यांचे मार्गदर्शन लाभले. शिवसेना महिला आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यावतीने जेवण , लहान मुलांचे दुधाचे पावडरचे पाकीटे व पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवसेना महिला आघाडी पूनम फडतरे, पल्लवी चिखलीकर, रूपाली बोचकिरे, सुषमा धर्म अधिकारी ,जयश्री मडीवडकर व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.