संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

हातकणंगले (प्रतिनिधी)  - येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल डेबोर्डिंग विभागाचा क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक खेळाडू विकास घोडके उपस्थित होते.

त्यांनी मनोगत व्यक्त करताना खेळाडूंनी खेळामध्ये आपले कौशल्य दाखवावे हार-जित याच्यापेक्षाही खेळातील आनंद घेणे महत्त्वाचे आहे असे सांगितले. संचालिका प्राचार्य सस्मिता मोहंती यांनी विद्यार्थ्यांनी खेळाकडे करिअर म्हणून पहावे असा संदेश आपल्या मनोगतातून दिला. सर्व विद्यार्थ्यांनी हाऊसनुसार प्रमुख अतिथींना मानवंदना दिली. त्यानंतर क्रीडाज्योतीचे पूजन करण्यात आले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ दिली.

अग्नी हाऊस, त्रिशूल हाऊस, आकाश हाऊस व पृथ्वी हाऊस या गटांतर्गत विविध स्पर्धा पार पडल्या. 100 मी, 200 मी, 400 मी, 800 मी रनिंग,थाळी फेक, गोळा फेक, लांब उडी, उंच उडी, रिले, कुस्ती, टेनिस, स्विमिंग, आर्चरी, शुटिंग या वैयक्तिक खेळांसोबतच बास्केटबॉल, फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, योगा स्पर्धा, बुद्धिबळ, ज्युडो, कराटे, तायकांदो यासारख्या सांघिक खेळांच्या स्पर्धाही पार पडल्या.

  यावेळी पालकांसाठीही विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये 50 मी रनिंग, रस्सीखेच, कोन रेस यासारख्या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये दिपाली चौगुले, श्रुती आमटे, प्रतीक चौगुले, विनोद खूपचंदानी,  बजतराय गांधी, नितीन जाधव, शितल गुजपडे, तृष्णावेणी जंगम, सुमय्या पटेल, अफसाना मकूभाई, संग्राम पाटील, ताहीर मकुभाई, स्नेहा पाटील, नितल छाजेड, तनुश्री पाटील या सर्वांना विविध स्पर्धेत मेडल प्राप्त झाले. 

 या कार्यक्रमासाठी संचालिका प्राचार्य सस्मिता मोहंती उपस्थित होत्या. प्राचार्य अस्कर अली, उपप्राचार्य नितीन माळी, उपप्राचार्या अर्चना पाटील, क्रीडा संचालक विठ्ठल केंचन्नावर, सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी वार्षिक क्रीडा महोत्सव स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल चेअरमन संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्वांचे अभिनंदन केले.