HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआर रुग्णालयातील विकासकामांना गती द्या – मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआर रुग्णालयातील विकासकामांना गती द्या –  मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

कोल्हापूर : शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरातील कामे तसेच, सीपीआर रुग्णालयातील विकासकामे दर्जेदार व जलदगतीने पूर्ण करा. नूतनीकृत सीपीआरचे लोकार्पण येत्या दिवाळीपूर्वी होण्यासाठी नियोजनबद्ध कामे करा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

    

शेंडा पार्क परिसरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात रस्ते, बांधिव गटर्स व फूटपाथचे काम, जमीन सपाटीकरण व सुशोभीकरण, बॅडमिंटन व टेबलटेनिस कोर्टचे बांधकाम, फॉरेन्सिक विभागाची इमारत, 125 निवासी डॉक्टर्स व 125 आंतरवासिता (महिला व पुरुष) यांच्यासाठी स्वतंत्र वसतिगृहाची इमारत,  150 परिचारिकांसाठी वसतीगृह व वार्षिक 100 क्षमतेचे परिचारिका प्रशिक्षण केंद्र इमारत बांधकाम, विद्युत व फर्निचर काम, 150 मुली व 150 मुलांसाठी वसतिगृह इमारत बांधकाम व फर्निचर काम, प्रस्तावित 600 खाटांचे सामान्य रुग्णालय, 250 खाटांचे अतिविशेषोपचार रुग्णालय, 250 खाटांच्या कर्करोग रुग्णालयासाठी काँक्रीट रस्ता तयार करणे आदी कामे जलदगतीने मार्गी लावण्याच्या सूचनाही मंत्री मुश्रीफांनी दिल्या.

शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसर व सीपीआर रुग्णालयातील विकासकामांबाबत आढावा बैठक मंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली शेंडा पार्क येथील अधिष्ठाता कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली. मंत्री  मुश्रीफ  पुढे म्हणाले, जिल्ह्यातील सर्वसामान्य, गरजू रुग्णांसाठी सीपीआर महत्त्वपूर्ण रुग्णालय आहे. रुग्णांना चांगल्यात चांगल्या वैद्यकीय सेवा देण्यासाठी सीपीआर परिसरातील सर्व विकासकामे जलद पूर्ण करा. उत्तुर येथील योगा व निसर्गोपचार महाविद्यालय, मौजे सांगाव येथील आयुर्वेद हॉस्पिटल व पिंपळगाव खुर्द येथील होमिओपॅथी हॉस्पिटल इमारतीचे काम लवकरात लवकर सुरु होण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया गतीने राबवा. शेंडा पार्क परिसरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची कामे गतीने मार्गी लावा. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टाकी उभारण्यासाठी अंदाजपत्रक सादर करा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात पूर्ण झालेली कामे, सुरु असणारी कामे व प्रस्तावित कामांचा सविस्तर आढावा मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी घेतला.

अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी विकासकामे पूर्ण करताना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली. कार्यकारी अभियंता रोहित तोंदले व महेश कांजर यांनी आतापर्यंत पूर्ण झालेल्या व प्रगतीपथावर असणाऱ्या कामांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. 

यावेळी या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, सीपीआरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले,  मनीष पवार, भाऊसाहेब हजारे आदी उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.