सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राष्ट्रीय पातळीवरील परिषद संपन्न

सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राष्ट्रीय पातळीवरील परिषद संपन्न

कोल्हापूर -  सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राष्ट्रीय पातळीवरील परिषद संपन्न झाली. आर एल तावडे फाउंडेशनचे, सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर आणि 'अ‍ॅसोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया' (APTI) महाराष्ट्र राज्य, यांच्या संयुक्त विद्यमाने "Emerging Trends in Drug Discovery and Translational Research" या विषयावर आधारित राष्ट्रीय पातळीवरील परिषद आज महाविद्यालयात संपन्न झाली.

या परिषदचे विषय नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टिम, रेग्युलेटरी अफेअर्स, आर्टीफिसिअल इंटेलिजन्स इ. होते. संस्थेच्या सचिव शोभा तावडे यांनी विद्यार्थ्यांना संशोधनाचे महत्त्व, नूतन संशोधनाच्या संधी, यावरती मार्गदर्शन केले व सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

या परिषदचे उदघाटन प्र.कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर कुलसचिव प्रो. डॉ. एम. एस. गणचारी, के. एल. ई विद्यापीठ बेळगाव, डॉ. हर्षा हेगडे शास्त्रज्ञ आय. सी. एम .आर, बेळगाव व रवींद्र पुरोहित संचालक आर. एन. फार्मा कनसल्टिंग पुणे, यांच्या हस्ते करण्यात आले. 

प्र.कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील यांनी, भारत सरकारच्या विविध मंत्रालयांमार्फत सुरू करण्यात आलेल्या संशोधन योजना शास्त्रज्ञ, उच्च शिक्षण संस्था, संशोधन संस्था आणि नवोद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर संधी या विषयावर मार्गदर्शन केले. प्रो. डॉ. एम. एस. गणचारी, यांनी औषध आणि संशोधन महत्त्व व नवीन संधी यावरती प्रकाश टाकला. डॉ. हर्षा हेगडे यांनी उपचार पद्धतीवर संशोधनाचे महत्त्व यावरती आपले मत व्यक्त केले. रवींद्र पुरोहित संशोधन व विकास, बायोसिमिलर्स, AI - आधारित औषध निर्मिती, आणि डिजिटल हेल्थ यासारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या संधी या वरती आपले विचार मांडले.

या परिषदेस विविध १२ राज्यातून ४१५ बी. फार्म, एम. फार्म, विध्यार्थी, प्राध्यापक तसेच पी.एच.डी रिसर्च स्कॉलर ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने सहभाग घेतला यावेळी सदर विद्यार्थ्यांनी शोध निबंध व पोस्टर प्रेज़ेंटेशन केले. या स्पर्धकांचे ऑनलाईन व ऑफलाईन विभागणीनुसार मूल्यांकन केले आणि विजेते आणि उपविजेते यांना डॉ. श्रीधर पाटील, दिपक जाधव आणि दिलीप जाधव यांनी बक्षीसे प्रदान केली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. सुजाता चौधरी व सूत्रसंचालन प्रा. निशिता वाणी यांनी केले. संस्थेच्या सचिव शोभा तावडे व सहसचिव सुजय तावडे, यांच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली संचालक डॉ. अनिलकुमार कुलकर्णी, प्राचार्य डॉ. राजकुमार बगली व परिषदेचे सचिव डॉ. आदित्य अरविंदेकर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अथक परीश्रमामुळे ही परिषद यशस्वीरित्या पूर्ण झाली. 

या परिषदेसाठी, डॉ. एस. एस. पाटील प्राचार्य जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ फार्मसी जयसिंगपूर , डॉ आर. डी हिरेमठ प्राचार्य के. डी सी.ए. इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी कोल्हापूर डॉ. धनराज जडगे प्राचार्य वुमेन्स कॉलेज ऑफ फार्मसी पेठ वडगाव, कोल्हापूर आदी उपस्थित होते.