१५ मे पासून कोल्हापूर ते नागपूर विमानसेवेला सुरूवात - खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर - १५ मे पासून कोल्हापूर ते नागपूर विमानसेवेला सुरूवात होत आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आता कोल्हापूर थेट राज्याच्या उपराजधानीशी हवाई मार्गे जोडलं जात आहे. आठवडयातील पाच दिवस कोल्हापूर - नागपूर - कोल्हापूर विमानसेवा सुरू होत असून, स्टार एअरवेजच्या विमानात १२ बिझनेस क्लास आणि ६४ इकोनॉमी क्लास आसन व्यवस्था असेल. त्यामुळे कोल्हापूरच्या उद्योग, व्यापार, पर्यटनाला चालना मिळणार आहे.
कोल्हापूरचे विमानतळ आता नवनवीन भरारी घेवू लागले आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने कोल्हापूर विमानतळाचा विकास आणि विस्तार यासाठी प्रयत्न केले, केंद्र सरकार स्तरावर पाठपुरावा केला. त्यामुळे धावपट्टी विस्तारीकरण, नाईट लॅण्डिंग, आधुनिक अग्निशमन वाहन, नवी टर्मिनल बिल्डिंग अशी कामे मार्गी लागली आहेत. विमानतळावरील भौतिक सुविधांसह विविध मार्गावर हवाई सेवा सुरू व्हावी, यासाठी खासदार महाडिक प्रयत्नशिल आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता कोल्हापूर ते नागपूर विमानसेवा सुरू होत आहे.
१५ मे पासून मंगळवार, बुधवार, गुरूवार, शुक्रवार आणि शनिवार असे आठवडयातील पाच दिवस, स्टार एअरवेजकडून कोल्हापूर-नागपूर-कोल्हापूर विमानसेवा सुरू होत आहे. नागपूरहून सकाळी दहा वाजता विमान उड्डाण करेल आणि सकाळी साडेअकरा वाजता कोल्हापुरात येईल. तर सकाळी बारा वाजता कोल्हापूरातून विमान उड्डाण करेल आणि दुपारी दीड वाजता हे विमान नागपूरमध्ये पोचेल. या विमानात बारा बिझनेस क्लास आणि ६४ इकोनॉमी क्लास आसने असतील. या नवीन विमानसेवेमुळं कोल्हापूरच्या व्यापार, उद्योग, पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.