शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भुयारी मार्गासाठी 8 कोटी 48 लाखाचा निधी मंजूर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मंत्री चंद्रकांत पाटील
शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व व पश्चिम भागास कायमस्वरूपी जोडण्याकरीता भुयारी मार्ग सर्विस रस्ता बांधण्याकरिता 8 कोटी 48 लाख 81 हजार रुपयांचा निधी या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला आहे.तसेच या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, या मुख्य रस्त्यावरून विद्यापीठातील विद्यार्थी, पालक, शिक्षक अशा सुमारे दोन ते तीन हजार नागरिकांची दररोज ये-जा सुरू असते.या रस्त्यावर पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून शहरात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. वर्दळीमुळे नागरिकांना हा रस्ता ओलांडणे अडचणीचे होत आहे. या ठिकाणी अनेकदा लहान-मोठे अपघाताचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे भुयारी मार्ग व सर्विस रोड साठी 8 कोटी 48 लाख 81 हजार रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता दिली आहे.