कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा , स्वप्नील कुसाळेला अर्जुन पुरस्कार जाहीर

कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा , स्वप्नील कुसाळेला अर्जुन पुरस्कार जाहीर

National Sports Award : भारत सरकारकडून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा गुरुवार 2 जानेवारी रोजी करण्यात आलेली आहे. यात 2024 मध्ये खेळरत्न, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार इत्यादींनी गौरवण्यात येणाऱ्या खेळाडूंची नावं समोर आली आहेत. यंदा खेळरत्न पुरस्कार 4 खेळाडूंना मिळाला असून अर्जुन अवॉर्ड यंदा 32 खेळाडूंना जाहीर करण्यात आलेला आहे. 

अर्जुन पुरस्कारासाठी  महाराष्ट्राच्या  स्वप्नील कुसाळे, मुरलीकांत पेटकर, सचिन खिलारी यांची निवड करण्यात आली.  स्वप्नील कुसळे  आणि स्वप्नील कुसळे यांना 2024 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत भारताला कांस्य पदक जिंकवून दिले होते. खाशाबा जाधव यांच्यानंतर अशी कामगिरी करणार तो दुसरा  खेळाडू आहे. स्वप्नील सह त्याची प्रशिक्षक दिपाली देशपांडे  यांना  देखील द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

राष्ट्रीय खेळ पुरस्कारांच्या यादीत महाराष्ट्राच्या चार खेळाडूंना पुरस्कार घोषित करण्यात आलेले आहेत. यात यंदा पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला शूटिंगमध्ये कांस्यपदक जिंकवून देणाऱ्या स्वप्निल कुसाळे याला  भारत सरकारकडून अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे. स्वप्निल कुसाळे हा मूळ कोल्हापूरचा असून तो रेल्वे कर्मचारी देखील आहे. स्वप्निल कुसाळेच्या रूपाने महाराष्ट्राला खाशाबा जाधवांनंतर दुसरं ऑलिम्पिक पदक मिळालं होतं. तर स्वप्निल कुसळे याला नेमबाजीचं प्रशिक्षण देणाऱ्या दिपाली देशपांडे यांना देखील द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात येणार आहे. 

सचिन खिलारी यालाही 'अर्जुन'

महाराष्ट्रातील सचिन सर्जेराव खिलारी याने देखील पॅरालिम्पिक 2024 मध्ये गोळा फेकीत कांस्य पदक जिंकलं होतं. 40 वर्षानंतर शॉटपुटमध्ये पदक जिंकणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला होता. तेव्हा या उल्लेखनीय कामगिरीसाठी सचिन खिलारी याला देखील अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच पॅरा जलतरणपटू मुरलीकांत पेटकर यांना देखील अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.