जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजेश गायकवाड यांची बदली

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजेश गायकवाड यांची बदली

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड यांची सातारा येथे बदली झाली आहे. डॉ. गायकवाड यांच्या जागी सोलापूर येथील जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे हे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. डॉ. गायकवाड यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये आपल्या कमी कालावधीतील सेवेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून आरोग्य विभाग सक्षम ठेवण्यासाठी चांगले प्रयत्न केले.