शाहू कारखाना मॅटवरील कुस्ती स्पर्धा दुसऱ्या दिवसीही रंगली

शाहू कारखाना मॅटवरील कुस्ती स्पर्धा दुसऱ्या दिवसीही रंगली

कागल (प्रतिनिधी) : शाहू साखर कारखान्याच्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत सायली दंडवते व सुकन्या मिठारी यांनी ७६किलो वजन गटात तर ४० किलो वजन गटात अमृता धनगर(तळंदगे),प्रणिती साठे(नंदगाव )वेदिका पाटील (पाचगाव) व आदिती कापडे(म्हाकवे)यांनी अंतिम फेरी प्रवेश केला.

काल शुक्रवारी बालगटातील लढती संपन्न झाल्या.आज स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता.१७) महिला व कुमार  गटात १४०मल्लांची नोंदणी झाली. उद्या रविवारी( ता.१८) रोजी मुलांच्या सिनियर  व ज्युनियर गटातील लढती होतील.तर सोमवारी(ता.१९) सर्व गटातील पहिल्या व दुसऱ्या क्रमांकासाठीच्या अंतिम लढती होतील.

छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व.विक्रमसिंह घाटगे  यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या मॅटवरील कुस्ती स्पर्धा आता शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे  यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनातून  सलग ३८ व्या वर्षी संपन्न होत आहेत.त्यास मल्लांसह कुस्ती शौकिनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

बाल गटातील अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या मल्लांची गटवाईज नावे अशी आहेत.

 

२४किलो गट - विश्वजीत शिनगारे तळंदगे, रुद्र पाटील बानगे,अथर्व पोतदार सिद्धनेर्ली,संचित पाटील मळगे खुर्द.

 २६किलो गट - संग्राम शिनगारे तळंदगे, ओम पोटले मतिवडे,राजवीर कुंभार एकोंडी,वैष्णव साबळे खेबवडे.

 २८ किलो गट-साईराज सुळगावे एकोंडी, करण तोडकर द-याचे  वडगाव,यश मगदूम सिद्धनेर्ली,श्रेयस पाटील कसबा सांगाव.

 ३०किलो गट-प्रेम शिनगारे तळंदगे,शिवेंद्रकुमार पाटील बामणी, रुद्राक्ष तळेकर केनवडे,राजवीर पोवार कागल.

 ३२ किलो गट- श्रेयश पुजारी तळंदगे,रितेश मगदूम बानगे,शिवरुद्र चौगुले शाहू साखर एकोंडी,सोहम पाटील म्हाकवे 

 ३५किलो गट- पृथ्वीराज मोहिते कोगील बुद्रुक,रणवीर सावंत उंदरवाडी,ओंकार काशीद दिंडनेर्ली,गजानन पाटील केनवडे

 ३८ किलो गट- समर्थ खंदारे सुरूपली,संस्कार माने सिद्धनेर्ली,अक्षय माने शेंडूर,नील भारमल मुरगुड

४१किलो गट - रविराज पाटील बानगे,हर्ष टिक्के नंदगाव,सोहम पाटील कंदलगाव, आदित्य पाटील बेलवळे खुर्द.

 *चित्रमय झलक कुस्ती परंपरेची* 

  स्पर्धास्थळी संयोजकांनी 'शाहू'मार्फत घेण्यात येणाऱ्या मॕटवरील व मातीतील कुस्ती मैदानाची क्षणचित्रे,राबविण्यात येणारे विविध उपक्रम,मान्यवरांची उपस्थिती,कारखाना मानधनधारक खेळाडूंची पदके व प्रशस्तीपत्रके यांची झलक दर्शविणारे जुने फोटो  स्वतंत्र दालनात लावले आहेत.यामध्ये स्व.विक्रमसिंहराजे घाटगे यांच्यासह माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख,हिंदकेसरी दिनानाथ सिंह यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीचे फोटो आहेत. कुस्ती परंपरेची चित्रमय झलक दर्शविणा-या  या दालनास भेट देऊन कुस्ती शौकिनांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.