टीचर्स क्रिकेट असोसिएशन च्या वतीने प्राथमिक माध्यमिक शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धा

टीचर्स क्रिकेट असोसिएशन च्या वतीने प्राथमिक माध्यमिक शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धा

सांगली प्रतिनिधी अशोक मासाळ

जीवन म्हणजे जणू क्रिकेटचाच खेळ बालपण तारुण्य व वृद्धावस्थेच्या पिचवर खेळला जाणारा खेळ हा टीचर्स क्रिकेट असोसिएशन सांगली यांच्या वतीने आयोजित प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धा आज दिनांक सात चार 2023 रोजी शिवाजी स्टेडियम सांगली येथे सकाळी दहा वाजता सुरू झाले आहेत या स्पर्धेचे आयोजक श्री लाखन मकानदार मित्र पाटील श्री अरविंद चव्हाण परेश पाटील यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे तर या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री प्रकाश बनणे चेअरमन शिक्षण सेवक सोसायटी सांगली श्री किरण सिंह सरनोबत राज्याध्यक्ष डीसीपीएस व एनपीएस संघर्ष समिती सांगली श्री राजेंद्र नागरगोजे महाराष्ट्र शिक्षण परिषद पुणे विभाग अध्यक्ष व श्री रवींद्र गवळी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित बापू दाभाडे संजय पवार सुरेश वन मोरे अनिल पाटील श्री मासाळ सर हे उपस्थित होते. यावेळी काही शिक्षकांचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभाग झाले आहेत ही स्पर्धा दिनांक 7/4 / 2023 व 9 /4 /2023या दोन दिवसात सामने होणार आहेत. आजचा उद्घाटक सामना हिंद वॉरियर्स विरोध रॉयल स्टार टीचर्स असा सम्राट प्रथम सुरू झाला आहे. यामधील हिंद वॉरियर्स या संघाला संघमालक म्हणून श्रीरंगराव भोसले लाभले असून त्यांनी सर्व खेळाडूंना खेळाडू किट दिली आहे

.