पाकिस्तानमध्ये सापडला तेलाचा मोठा साठा
पाकिस्तानमध्ये सापडला तेलाचा मोठा साठा
इस्लामाबाद: पाकिस्तानमधील सिंध प्रांतात तेलाचा मोठा साठा सापडला आहे. या बाबतची घोषणा पाकिस्तान पेट्रोलियम लिमिटेड (पीपीएल) ने केली आहे. सिंध प्रांतातील सुजावल जिल्ह्यातील शाह बंदर ब्लॉकमध्ये तेल आणि वायूचे नवीन साठे सापडल्याची पीपीएल माहिती दिली. तसेच कंपनीने पाकिस्तान स्टॉक एक्स्चेंजला तेल साठ्याच्या शोधाची माहिती दिली. शाह बंदर ब्लॉकमधील एका विहीरीतुन दररोज १० दशलक्ष मानक घनफूट नैसर्गिक वायू आणि १५० बॅरलपेक्षा जास्त हलके तेल मिळते.
या विहिरीतील नैसर्गिक जलाशयाचा दाब २,८०० पौंड प्रति चौरस इंच आहे. या विहिरीतून काढलेल्या वायूवर सुजावल गॅस प्रोसेसिंग प्लांटमध्ये प्रक्रिया केली जात आहे. आणि सुई सदर्न गॅस कंपनीच्या प्रणालीमध्ये जोडली जात आहे. ज्यामुळे या प्रदेशात नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढला आहे.