पार्किंगमधील कार पडली खड्यात

पार्किंगमधील कार पडली खड्यात

नागपूर प्रतिनिधी : नागपुरातील रामदासपेठ परिसरात घडलेल्या दुर्घटनेने आणखी एकदा वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांवर लक्ष केंद्रित केले आहे. केदार डेव्हलपर्सच्या वतीने निर्माणाधीन टोलेजंग इमारतीच्या पाया खचल्यामुळे जमिनीला भेगा पडून पार्किंगमध्ये उभी असलेली एक कार 40 ते 50 फूट खोल खड्ड्यात कोसळली. सुदैवाने, या घटनेत कुठलीही प्राणहानी झाली नाही.

ही दुर्घटना इमारतीच्या फाउंडेशन आणि बेसमेंटचे काम सुरू असताना घडली. मुसळधार वादळी वारा आणि पावसामुळे जमीन भुसभुशीत झाल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. यामुळे, या परिसरात सुरक्षात्मक उपाययोजनांवर विशेष लक्ष दिले जात आहे. ठिकठिकाणी सावधानतेचे मार्क लावण्यात आले आहेत.

गेल्या वर्षी अंबाझरी तलावातून आलेल्या ओव्हर फ्लोच्या पाण्यामुळे रामदासपेठ परिसरात मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे आता अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे.