प्रख्यात दिग्दर्शक, निर्माते श्याम बेनेगल यांनि घेतला अखेरचा श्वास
![प्रख्यात दिग्दर्शक, निर्माते श्याम बेनेगल यांनि घेतला अखेरचा श्वास](https://majhamaharashtra.in/uploads/images/202412/image_750x_676a979d96542.jpg)
मुंबई: प्रख्यात दिग्दर्शक, निर्माते श्याम बेनेगल यांनि सोमवारी सायंकाळी अखेरचा श्वास घेतला. मृत्यू समयी ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
परिवर्तन चळवळीला गती देणारे दिग्दर्शक म्हणून श्याम बेनेगल यांची ओळख होती. त्यांनी सामाजिक आशयप्रधान चित्रपटांद्वारे भारतीय चित्रपटसृष्टीवर ठसा उमटवला. ‘अंकुर’, ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’, ‘जुनून’ यांच्यासह अनेक वास्तववादी चित्रपट त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला दिले. ‘अंकुर’मुळे हिंदी चित्रपटसृष्टीला शबाना आझमी नावाची अभिनेत्री मिळाली. ‘अंकुर’ या त्यांच्या पहिल्यावहिल्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं; तसंच ‘निशांत’, ‘मंथन’, ‘जुनून’, ‘आरोहण’ या चित्रपटांनीही राष्ट्रीय पुरस्कार पटकावले.
बेनेगल यांचा सर्वात आवडता चित्रपट 'मंडी' हा होता. हा चित्रपट १९८३ मध्ये प्रदर्शित झाला आणि सिल्व्हर ज्युबिली ठरला. चित्रपटात रत्ना पाठक शाह आणि स्मिता पाटील यांच्या भूमिका होत्या. बेनेगल यांनी मंडी चित्रपटाविषयी एका मुलाखतीत किस्सा सांगितलं, मी जे सिनेमे केले ते मला करायचे होते. सिनेमे १०० आठवडे थिएटरमध्ये राहतील असा विचार मी केला नव्हता. काही वर्षांपूर्वी मी मंडी सिनेमा बनवला होता. तो सिल्व्हर जुबली ठरला. या सिनेमात माझे आवडते कलाकार होते.अमरीश, ओम, नसीरुद्दीन, शबाना, स्मिता होते. आम्ही हैदराबाद इथं सिनेमाचं शूटिंग केलं होतं. गंमत म्हणजे आम्ही काही न करताच शुटिंग करत होतो. सगळं आपोआपच होत गेल. ४५ दिवसाचे शेड्युल बनवलं होत. पण आम्ही २८ दिवसातच सिनेमा पूर्ण केला.