प्रा. डॉ. संदीप भगवान वाकडे यांना "राज्यस्तरीय आदर्श साहित्यसेवक भाषागौरव पुरस्कार" प्रदान

प्रा. डॉ. संदीप भगवान वाकडे यांना "राज्यस्तरीय आदर्श साहित्यसेवक भाषागौरव पुरस्कार" प्रदान

दौंड:प्रतिनिधी:दिनेश पवार

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा पुणे शहरातील सांस्कृतिक सभागृहात थाटात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रांतून पुरस्कारासाठी निवडलेल्या मानकऱ्यांमध्ये एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर येथील प्रा. डॉ. संदीप भगवान वाकडे यांना राज्यस्तरीय आदर्श साहित्यसेवक भाषागौरव पुरस्कारा ने सन्मानित करण्यात आले. मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, गौरवपदक, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते. 

प्रा. डॉ. संदीप वाकडे हे सध्या एस. एम. जोशी महाविद्यालय हडपसर येथे मराठी विभागात सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी जग बदल घालूनि घाव एकनाथ आवाड यांचे आत्मकथन: एक अभ्यास या विषयावर एम.फिल. पदवी प्राप्त केलेली आहे. तसेच मराठी कादंबरीतून आलेले होळकर राजघराण्याचे चित्रण (मल्हारराव होळकर, अहल्याबाई होळकर, यशवंतराव होळकर ) याविषयावर पी.एच.डी. (विद्यावाचस्पती) ही पदवी प्राप्त केलेली आहे. त्यांचे विविध ग्रंथ व जर्नल्समधून १४ शोधनिबंध व विविध वर्तमानपत्रांतून समाजसुधारकांविषयीचे लेख प्रकाशित झाले आहेत.निवडक मराठी साहित्यकृतीतून अभिव्यक्त होणारा धनगर समाज एक अभ्यास या विषयावरती मायनर रिसर्च प्रोजेक्टचे पूर्ण केला आहे.त्यांच्या या साहित्यविषयक कामगिरीची दखल घेऊन मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्या वतीने आयोजित "राज्यस्तरीय आदर्श साहित्यसेवक भाषागौरव पुरस्कारा"ने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड साहेब यांनी त्यांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक,कार्यालयीन सेवक व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.