'प्रिन्स शिवाजी' च्या न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) कॉलेजला AICTE ची मान्यता

छत्रपती शाहू महाराज स्थापित आणि महाराष्ट्र शासनाचा 'आदर्श शिक्षण संस्था' पुरस्कार प्राप्त श्री. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस या संस्थेने आज गौरवशाली १०० वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे. या संस्थेच्या न्यू पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये डिग्री इंजीनियरिंग कोर्सेस सुरू करण्यात येत असून यास अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्याकडून मान्यता मिळाली आहे. त्याचबरोबर न्यू पॉलिटेक्निकचे नामांतर आता न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ( एनआयटी) असे करण्यात आले असल्याची माहिती चेअरमन डॉ.के. जी पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावर्षी शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवे चार डिग्री कोर्सेस आणि डिप्लोमा कोर्सेसची सुरूवात करण्यात आली आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती डॉ. संजय दाभोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रजिस्टर डॉ. नितीन पाटील, सुभाष यादव, संग्रामसिंह पाटील, सुहास देशमुख, बाजीराव राजिगरे, दिपक जगताप, विक्रम गवळी, प्रवीण जाधव उपस्थित होते.

'प्रिन्स शिवाजी' च्या न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) कॉलेजला AICTE ची मान्यता
'प्रिन्स शिवाजी' च्या न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) कॉलेजला AICTE ची मान्यता