... म्हणून अजित पवारांच्यात मुंडेंचा राजीनामा घेण्याची हिंमत नाही ; संजय राऊत यांचा घणाघात

... म्हणून अजित पवारांच्यात मुंडेंचा राजीनामा घेण्याची हिंमत नाही ; संजय राऊत यांचा घणाघात

मुंबई : महाराष्ट्रात सध्या सगळ्याच माफियांना अभय आहे. सगळ्याच माफियांना राजकीय आशीर्वाद आहे. जे पक्ष सरकार आहेत, त्यातील अनेक मंत्री माफिया आणि खंडणीखोरांशी संबंधित आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनामासाठी सर्व स्तरावर दबाव आहे, आक्रोश आहे. पण अजित पवार यांच्यात हिंमत नाही, देवेंद्र फडणवीस यांचीही हिंमत नाही, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 

बीड येथील गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला कित्येक दिवस उलटून गेले तरी अजूनही हे प्रकरण   सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर या हत्या प्रकरणाशी संबंधित असलेला खंडणीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

धनंजय मुंडे यांचा मंत्रि‍पदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे समजते. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.

अपराध्याला जात आणि धर्म नसतो

संतोष देशमुख यांचा खून, सोमनाथ सूर्यवंशी यांचा खून हे फार मोठे षडयंत्र आणि कारस्थान होतं. त्यामध्ये नक्की काय आहे हे सांगण्यापेक्षा आपली जातीय व्होट बँक सांभाळण्यासाठी खऱ्या खुन्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. तो निषेधार्ह आहे. धनंजय मुंडे यांच्या लोकांनी ज्यांचे खून केले हे त्यांच्याच समाजाचे आहेत. बीड भागातले 90 टक्के खून हे त्यांच्यात समाजाचे आहेत. या जात आणू नका, अपराधी हा अपराधीच असतो, अपराध्याला जात आणि धर्म नसतो, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केलाय.