राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मुलाखती पुण्यात पार पडल्या

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मुलाखती पुण्यात पार पडल्या

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज पुण्यात खा.शरद पवार  उपस्थितीत पार पडल्या. यामध्ये कोल्हापूर उत्तरसाठी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, चंदगड मधून डॉ. नंदाताई बाभुळकर कुपेकर व अमरसिंह चव्हाण, राधानगरी  मधून ए. वाय. पाटील, संतोष मेघाणे व डॉ.नवज्योतिसिंह देसाई, कागल मधून समरजितसिंहराजे घाटगे, इचलकरंजी मधून माजी आमदार अशोकराव जांभळे, मदन कारंडे, तर शिरोळ मधून स्नेहा देसाई यांच्या मुलाखती झाल्या. यावेळी कोल्हापूर मधून कोल्हापूर शहराध्यक्ष आर. के पोवार, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, प्रदेश प्रवक्ते राजीव आवळे, रामराजे कुपेकर, गडहिंग्लज तालुकध्यक्ष शिवाजी माने, भुदरगड तालुकध्यक्ष धनराज चव्हाण, वसंतराव देसाई, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या मुलाखती शरद पवार यांच्या सह पक्षाच्या संसदीय कमिटीचे सदस्य खा. सुप्रियाताई सुळे, आ. बाळासाहेब पाटील, खा. अमोल कोल्हे, आ. रोहित पवार, आ.शशिकांत शिंदे, खा. धैर्यशील मोहिते पाटील, खा.फौजिया खान, माजी खासदार वंदना चव्हाण  आदी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झाल्या.