श्री शाहू हायस्कूल, ज्यूनियर कॉलेज कागल येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन

श्री शाहू हायस्कूल, ज्यूनियर कॉलेज कागल येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन
युवा पिढीने ध्येय आणि दिशा निश्चित करावी :न्यायमूर्ती बी. डी. गोरे

सुभाष भोसले / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी

कागल येथील श्री शाहू हायस्कूल ज्युनिअर कॉलेज येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. न्यायमूर्ती बी. डी. गोरे हे या शिबीराच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी त्यांनी युवा पिढीने ध्येय आणि दिशा निश्चित करा असा संदेश दिला.

अॅड . ए. एस. शितोळे यांनी बालहक्क कायद्यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच अॅड संग्राम गुरव यांनी 'बेटी बचाव, बेटी पढाव' असा संदेश दिला. पोलीस उपनिरीक्षक दिप्ती करपे यांनी पोक्सो कायद्यासंदर्भात महत्त्वाची माहिती सांगितली. प्राचार्य बी. के. मडिवाळ यांनी वेळेचा सदुपयोग करा, महाविद्यालयान शिक्षण आयुष्याला कलाटणी देणारे आहे असा संदेश युवा पिढीला दिला. प्रा .नेताजी गिरी  यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख करून दिली तसेच प्रा. व्ही. एल. शिंदे यांनी आपल्या सूत्रसंचालनातून संदेशाचे प्रबोधन केले. 

या कार्यक्रमाला न्यायमूर्ती बी. डी. गोरे, अॅड. एस. एस. शितोळे, अॅड. संग्राम गुरव, पोलीस उपनिरीक्षक दीप्ती करपे,  प्राचार्य बी. के. मडिवाळ, उपप्राचार्य सौ. एस. एस. पाटील त्याचबरोबर शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थीनी उपस्थित होते.