"ससून रुग्णालय गुन्हेगारांचा अड्डा"; रवींद्र दंगेकरांचा हल्लाबोल

"ससून रुग्णालय गुन्हेगारांचा अड्डा"; रवींद्र दंगेकरांचा हल्लाबोल

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात, पुण्यातील ससून रुग्णालयातील विविध प्रश्नांवर चर्चा झाली. आमदार रवींद्र धंगेकर यांनी विधानसभेत या रुग्णालयातील भ्रष्ट्राचार आणि गैरव्यवहारांच्या मुद्द्यांवरून सरकारवर टीका केली. त्यांनी सांगितलं की, "ससून रुग्णालय गुन्हेगारांचा अड्डा झालाय." या वक्तव्यानंतर विधानसभेत एकच गोंधळ उडाला.विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही धंगेकर यांना पाठिंबा देत, ससून रुग्णालयातील परिस्थितीवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी या संदर्भात सरकारकडून तातडीने कारवाईची मागणी केली.