सायबर ट्रस्टच्यावतीनं गायक हरिहरन यांच्या कार्यक्रमासाठी दिला नव्याने बांधलेलं सभागृह
कोल्हापूर (प्रतिनिधि) : संगीत सूर्यकेशराव भोसले नाट्यगृहाची घडलेली दुर्घटना दुर्देवी होती. या घटनेमुळे नाट्यगृहात आयोजित केलेले कार्यक्रम रद्द करण्यात आल. याचा विचार करून शो मस्ट गो ऑन या तत्त्वानं ,प्रख्यात गायक हरिहरन यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द होऊ नये.रसिकांचे मन निराशा होऊ नये. यासाठी सायबर ट्रस्टने या कार्यक्रमासाठी संपूर्ण तयार झालेला ऑडिटोरियम हॉल कार्यक्रम पुरता वापरण्यास देण्याच ठरवलं असल्याची माहिती डॉ राजेंद्र पारिजात आणि डॉ.डी.एस.माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आठ ऑगस्ट रोजी ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेली आग ही दुर्दैवी घटना होती.कोल्हापुरातील हे एकमेव नाट्यगृह आहे. इथले पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द होऊ नयेत, यासाठी सायबर ट्रस्टच्या वतीने नव्याने सुरू करण्यात आलेल्या सायबर कॉलेज इथल्या ऑडिटरियम हॉलमध्ये, उद्या होणाऱ्या प्रसिद्ध गायक हरिहरन यांच्या गझल कार्यक्रमासाठी देण्याचा निर्णय सायबर ट्रस्टच्यावतीनं घेण्यात आला. याची माहिती देण्यासाठी आज सायबर कॉलेजच्यावतीनं पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. नव्याने बांधण्यात आलेला हॉल हा 850 लोकांचे आसन क्षमता असलेला, सुमारे दहा कोटी रुपये खर्च करून, अत्याधुनिक असा शैक्षणिक स्तरावरील सांस्कृतिक कार्यक्रमासाठी बनवलेला आहे.अशी माहिती सायबर कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस.पी रथ यांनी दिली.या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नाट्यवित्तरक आनंद कुलकर्णी, गिरीश महाजन, सायबर तर्फे संचालक डॉ एसपी रथ, डॉ विनायक साळोखे उपस्थित होते.