सायबर तर्फे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदचे आयोजन

सायबर तर्फे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदचे आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर, महाराष्ट्र छत्रपती शाहू बिझनेस एज्युकेशन अॅड रिसर्च (सीबेर) संस्था २२ व २३ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांच्या कॅम्पसवरील आनंद भवन सभागृहात 'जागतिक आव्हाने आणि जीवनातील उपाय या विषयावर एक आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत जीवन, लोक,उत्पादने आणि प्रणाली या विविध क्षेत्रांमधील आव्हानांवर चर्चा होणार आहे. ICSSR, नवी दिल्लीच्या प्रार्याजकत्वाखाली आयोजित या परिषदेसाठी भारतातील ७२ विद्‌यापीठे आणि ११ आआंतरराष्ट्रीय संस्थांकडून ३०४ शोधनिबंध सादर झाले असून, त्यापैकी १०४ निवडक शोधनिबंध ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने सादर केले जाणार आहे. 

या परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे श्रीलंकेतील वदुनिया वि‌द्यापीठ आणि मॉरिशसच्या टेक्नॉलॉजी, आंतोन दे कॉम युनिव्ह‌र्सिटी ऑफ सुरेना परमरनबो वि‌द्यापीठाशी केलेले आंतरराष्ट्रीय सहयोग, कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून एस. बी. रेशेलर्स प्रा. लि. व सायनेर्जी सोम इंडस्ट्रीज प्रा. लि., कोल्हापूरचे व्यवस्थापकीय संचालक सचिन शिरगावकर उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून प्रा. संजीवनी गिनीगद्दारा (श्रीलंका) आणि प्रा. विराज फुलेना (मॉरिशस) यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

 या कार्यक्रमात तीन कार्यात्मक विषयांवरील आणि दोन साहित्यविषयक अशा पाच पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. विशेष म्हणजे, डॉ. एस. पी. रथ यांचा काव्यसंग्रह प्रकाशित होणार असून, त्यांचा काव्यक्षेत्रातील योगदानही या परिषदेचे वैशिष्ट्य ठरणार आहे.

 ही परिषद जागतिक आव्हाने आणि उपाययोजनांवर मार्गदर्शन करुन उपस्थितांना सकारात्मक बदलासाठी प्रेरणा देईल.