सुरेश धस यांच्यासह भाजपवर संजय राऊत यांनी साधला निशाणा, म्हणाले....

सुरेश धस यांच्यासह भाजपवर संजय राऊत यांनी साधला निशाणा, म्हणाले....

मुंबई : मनोज जरांगेंनी निवडणुकीनंतर आंदोलनाला सुरूवात केली होती. त्या आंदोलनची धार कमी करण्यासाठी भाजपने सुरेश धस हा मराठा समाजाचा मोहरा पुढे आणला. यासाठी धस यांनी संतोष देशमुख खून प्रकरणाचा वापर केला. मग या खून प्रकरणात भाजपचा हात होता का? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला आहे.

भाजप नेते सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरलं होतं. मात्र ज्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. आता त्याच धनंजय मुंडे यांना रात्री गुपचूपपणे धस भेटल्याने त्यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सुरेश धस आणि भाजपवर निशाणा साधला.

राजकारणात किमान नैतिकतेच पालन व्हावं, भाजपचे आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये आंदोलन सुरू केलं आणि एका खूनाला वाचा फुटली. खरे आरोपी आका आणि आकाचा आका हे शब्द भाजपने आणले, चंद्रशेखर बावनकुळे आणि फडणवीसांनी यांनी सांगावं धस यांच्याशी आमचा काही संबंध नाही. सुरेश धस यांनी पहिली बोंब मारली तेव्हाच त्यांना थांबायला हवं होतं. पण धसना  बोंबाबोंब करू दिली आणि बीडमध्ये वातावरण निर्मिती करू दिली. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये धस यांनी आंदोलनाला सुरूवात केली. देशमुख यांच्या परिवाराला घेऊन त्यांनी बीडमध्ये स्वत:चं नेतृत्त्व उभं करण्याचा प्रयत्न करत त्यांच्या अश्रुंचा बाजार केला.

...मग लोकांच्या मनात संशय निर्माण होणारच 

वाल्मिक कराड किंवा त्याचा बॉस धनंजय मुंडे यांच्याविषयी माहिती कोणी दिली? बिहार टाईप टोळ्यांचं नेतृ्त्त्व कोण करतंय? हे सुरेश धस यांनी महाराष्ट्राला आणि देशाला सांगितलं. धनंजय मुंडे यांच्यासंदर्भात धस यांची परखड होती की ते या टोळ्यांचे मुख्य सूत्रधार होते. त्याच मुंडेंना तुम्ही रात्री भेटायला जाता, चार तास बसून जेवण करता मग लोकांच्या मनात संशय निर्माण होणारच . पण तुम्ही ज्यांच्यावर आरोप करता, ज्यांना खूनाचे सूत्रधार मानता, बीडमधील मिर्झापूरचे डॉन म्हणता त्यांना रात्री गुपचूप भेटता आणि याचे फडणवीस हे समर्थन करतात. म्हणजे मिलीभगत आहे की काय? यामध्ये फडणवीस आणि बावनकुळेंच्या नैतिकतेचा बुरखा फाटला आहे , असेही संजय राऊत म्हणाले.