स्वतः सोबत देशाच्या विकासासाठी स्वयंशिस्त महत्त्वाची-लेफ्ट.शंभूराज पाटील

स्वतः सोबत देशाच्या विकासासाठी स्वयंशिस्त महत्त्वाची-लेफ्ट.शंभूराज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी : ७६ व्या भारताचा प्रजासत्ताक दिन कोल्हापूर येथील केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयात प्रेरणादायी उपक्रमांनी संपन्न झाला. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सैन्य दलातील तरुण अधिकारी लेफ्ट.शंभूराज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना स्वयंशिस्तीचे महत्व विशद केले. कॉलेजमधील सर्व प्रकारच्या उपक्रमांमध्ये जबाबदारी घेऊन काम करण्याचा भविष्यात स्वतःला मिळालेला फायदा ,अनुभव त्यांनी मोजक्या शब्दात अत्यंत प्रभावीपणे उपस्थित विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केला.

महाविद्यालयाच्या एनसीसी युनिटने अत्यंत प्रभावीपणे 'रायफल ड्रिल' व 'सेक्शन फॉर्मेशन' सादर केले. यानंतर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एनएसएस विभागाने *सायबर सिक्युरिटी* या विषयाला घेऊन बहारदार पथनाट्य सादर केले. प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा *पायोनियर -२५* च्या पोस्टर चे अनावरण करण्यात आले.स्टार्टअप साठी सुरू केलेल्या केआयटी निधी आयटीबीआय च्या संकेतस्थळाचे अनावरण संस्थेचे अध्यक्ष श्री.साजिद हुदली यांच्या हस्ते करण्यात आले.निधी आयटीबीआयचे कार्यकारी संचालक श्री.सुधीर आरळी यांनी याबाबत उपस्थितांना माहिती दिली. यावेळी निधी आयटीबीआय च्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष व केआयटी चे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर महाविद्यालयाच्या *शौर्य* विद्यार्थी व्यासपीठाच्या वतीने प्रमुख अतिथी लेफ्ट.शंभूराज पाटील व नुकतेच भारतीय सैन्य दलाच्या अधिकारी प्रशिक्षणासाठी निवडले गेलेले माजी विद्यार्थी श्री.यश लाळे यांचा विद्यार्थी वर्गाशी मुक्त संवाद संपन्न झाला. 

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष  साजिद हुदली,उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव  दीपक चौगुले,विश्वस्त  सुनील कुलकर्णी, दिलीप जोशी, केआयटी आयमर चे डॉ.सुजय खाडिलकर, रजिस्ट्रार डॉ.दत्तात्रय साठे उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा.विजय रोकडे व एनसीसी विभागाचे प्रा.रणजीत पाटील व एन. एस.एस.चे कार्यक्रम अधिकारी डॉ.निवास पाटील यांनी केले.