Gold Rate Today : सोनं स्वस्त झालं की महागलं ? पहा एका क्लिकवर

Gold Rate Today : सोनं स्वस्त झालं की महागलं ? पहा एका  क्लिकवर

मुंबई: सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी 13 मे 2025 चा दिवस किंचित दिलासादायक ठरला आहे. मागील काही दिवसांतील सततच्या चढ-उतारांनंतर, सोन्याच्या किमतीत सौम्य घसरण पाहायला मिळाली आहे. ही स्थिरता संभाव्य गुंतवणूकदारांसाठी संधी ठरू शकते.

सोन्याच्या दरांवर आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल, डॉलर-रुपया विनिमय दर, स्थानिक मागणी आणि भारत-पाक तणाव यांचा थेट परिणाम होतो. या सर्व घटकांचा विचार करता, सध्या दरात स्थिरता दिसत आहे.

12 मे रोजी सोन्याचे दर बऱ्याच दिवसांनंतर घसरले होते. 13 मे रोजी, गुड रिटर्न्सच्या माहितीनुसार, 24 कॅरेट सोनं प्रति 10 ग्रॅम 96,870 वर पोहोचलं (कालच्या तुलनेत 10 रु  ची घट) 22 कॅरेट सोनं 87,650 प्रति 10 ग्रॅम दराने उपलब्ध आहे. MCX निर्देशांकानुसार सोनं 92,986 रुपये 10 ग्रॅम तर चांदी 98,900 रुपये किलो अशी आहे. 

सध्याच्या दरांची घसरण खूप मोठी नसली, तरी सोन्यात दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही स्थिरता महत्त्वाची आहे. मात्र, बाजाराचा सखोल अभ्यास आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच निर्णय घेणे योग्य ठरेल.