श्री क्षेत्र जोतिबा मंदिरातील चप्पल बंदी व्हावी ;महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा अध्यक्ष रोहीत मिटके यांच्या मागणीला यश

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे 

कोल्हापूर,पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती ने दिले एक महीण्याचे आश्वासन

श्री क्षेत्र जोतिबा मंदिरातील चप्पल बंदी व्हावी तसेच मंदिरातील निकृष्ट दर्जाच्या झालेल्या ड्रेनेज तसेच दगडी फरशी कामासंदर्भात संबंधित कंत्रातदार व त्यांना पाठीशी घालणा-या अधिका-यांवर कारवाई करावि यासाठी मनसेचे गुरुवार दि २३ रोजी सकाळपासुन उपोषण सुरु होते. सदर उपोषणाची दखल घेवुन समिती चे सचिव मा. श्री शिवराज नाईकवडे यांनी सदर लोकांवर कारवाई करु तसेच मंदिरातील चप्पल बंदी करु असे आश्वासन दिले. सदर कामासाठी त्यांनी एक महीण्याची मुदत घेतली आहे. रात्री उशीरा याचे लेखी पत्र दिल्यानंतर सदर उपोषण मागे घेण्यात आले. या उपोषणास जिल्हाउपाध्यक्ष मोहन शेळके,ता अध्यक्ष विशाल मोरे , ता उपाध्यक्ष लखन लादे यांच्यामार्गदर्शनाखाली तसेच बाबु सांगळे बंडा फुकटे हेमा भोरे नवनाथ लादे,प्रोमोद भिवदर्णे, योगेश लादे, कुमार सांगळे ,अमित मिटके व ग्रामस्थ उपस्थित होते तसेच शिवसेना शाखा जोतिबा पन्हाळा ता अध्यक्ष अशोक पाटील तसेच भाजपा शाखा जोतिबा व गोकुळ चे संचालक मा. मुरलीधर जाधव यांनी या आंदोलनास जाहीर पाठींबा दर्शविला तसेच आखिल भारतीय गुरव समाज चे मारुती सातार्डेकर, व ओमकार सांगळे तसेच कृष्णात बुने माजी डेपोटी जग्गनाथ दादर्णे यांनी ही आंदोलन स्थळी भेट देवुन पाठींबा दर्शविला.