RCB चा विराट कोहलीला झटका ; कर्णधार पदावरून डावललं
![RCB चा विराट कोहलीला झटका ; कर्णधार पदावरून डावललं](https://majhamaharashtra.in/uploads/images/202502/image_750x_67adb11276b30.jpg)
माझा महाराष्ट्र ऑनलाईन : इंडियन प्रिमिअर लीगच्या 2025 च्या पर्वाआधीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला एक मोठा धक्का दिला आहे. कर्णधार पदावरून विराटला डावलण्यात आलं आहे. आज आरसीबीने आपल्या संघाचा नवा कर्णधार रजत पाटीदार असेल असं जाहीर केलं आहे.
स्थानिक क्रिकेटमध्ये रजत पाटीदार हे अत्यंत महत्वाचं नाव असून त्याच्याकडे उत्तम नेतृत्व गुण असलेला खेळाडू म्हणून पाहिलं जातं. रजत पाटीदारने सय्यद मुस्ताक अली चषक स्पर्धेमध्ये मध्य प्रदेशच्या संघाचं नेतृत्व केलं होतं. अंतिम सामन्यामध्ये मध्य प्रदेशचा संघ मुंबईविरुद्ध पराभूत झालेला.
फॅफ ड्युप्लेसीसला आरसीबी व्यवस्थापनाने करारमुक्त केल्यानंतर मेगा ऑक्शनमध्ये कोणत्याही मोठ्या खेळाडूवर बोली लावली नाही. त्यामुळे आता संघाकडे असलेल्या खेळाडूंमधूनच कर्णधार निवडला जाणार हे लिलावानंतर स्पष्ट झालं होतं. विराट कोहलीने 2013 ते 2021 दरम्यान आरसीबीचं नेतृत्व केलं आहे.
'हे' आहेत आजपर्यंतचे RCB चे कर्णधार
आरसीबीने 2009, 2011 आणि 2016 साली आयपीएलची फायनल खेळली आहे. मात्र एकदाही आरसीबीला जेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. रजतपूर्वी राहुल द्रविड, डॅनिअल व्हिक्टोरी, शेन वॉट्सन, विराट कोहली, फॅफ ड्युप्लेसीस, शेन वॉट्सन आणि अनिल कुंबळे या सात खेळाडूंनी आतापर्यंत आरसीबीचं कर्णधारपद भूषवलं आहे.
2025 च्या पर्वासाठी अशी असेल टीम RCB
रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, लियाम लिव्हिंगस्टोन, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, जोश हेझलवूड, रसिक दार, सुयश शर्मा, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, नुवान तुषारा, मनोज भंडगे, जेकब चक्की, चक्क चक्की, चक्क चक्की, कृष्णल पंड्या. लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी.