अजित पवार सोशल फाउंडेशनच्या मुख्य संघटक पदी महादेव माळी

सांगली : कासेगांव (ता. वाळवा) येथील महादेव प्रभाकर माळी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार सोशल फाउंडेशनच्या मुख्य संघटक पदी निवड झाल्याचे पत्र संस्थापक अध्यक्ष पंकज तंतरपाळे यांनी दिले .
या वेळी बोलताना महादेव माळी म्हणाले ,अजित पवार सोशल फाउंडेशनच्या खासदार सुनेत्राताई पवार , युवानेते पार्थ व जय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यावर दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन. गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी काम करुन अजित पवार यांचा हात बळकट करण्यासाठी सदैव तत्पर राहिन व प्रमाणिकपणे सदैव निष्ठेने काम करून पुढील काळात पश्चिम महाराष्ट्र मध्ये संघटना बळकट करण्यासाठी कार्यरत राहीन ,असेही माळी यावेळी म्हणाले.