HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

आषाढी एकादशी निमित्त नंदवाळ दिंडीत वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व हरीपाठ वाटप

आषाढी एकादशी निमित्त नंदवाळ दिंडीत वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व हरीपाठ वाटप

कोल्हापूर (प्रतिनिधी) - आषाढी एकादशीच्या निमित्ताने कोल्हापूर ते प्रति पंढरपूर (नंदवाळ) ता. करवीर या मार्गावर दरवर्षी प्रमाणे काढण्यात आलेली पारंपरिक पायी दिंडी भक्तिभावाने पार पडली. हजारो वारकरी, टाळ - मृदंगाच्या गजरात सहभागी झाले असून, या भक्तिमय वातावरणात गोकुळ दूध संघाने वारकऱ्यांच्या सेवेसाठी मोफत सुगंधी दूध आणि हरीपाठ पुस्तिकांचे वाटप करून सामाजिक बांधिलकीची परंपरा जपली.

या पायी दिंडीचे औचित्य साधून दिंडीतील भाविकांना गोकुळच्या वतीने ५ हजार सार्थ हरिपाठ पुस्तिका तसेच सुगंधी दूधाचे वाटप गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्यासोबत ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, संभाजी पाटील, संचालिका शौमिका महाडिक उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, नंदवाळ दिंडीत दरवर्षी हजारो वारकरी सहभाग घेतात. गोकुळतर्फे आम्ही त्यांच्यासाठी दिलेले दूध आणि हरीपाठ हे केवळ सेवा नव्हे, तर आमचं भक्तीभावातून केलेलं योगदान आहे. शेतकरी हे गोकुळचे आधारस्तंभ आहेत. त्यांचं हित आणि समाजाची सेवा हेच गोकुळचं खऱ्या अर्थाने काम आहे.

यावेळी कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, मार्केटिंग व्यवस्थापक हनमंत पाटील, उपेंद्र चव्हाण, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, लक्ष्मण धनवडे, उल्हास पाटील, महिला नेतृत्व अधिकारी मृण्मयी सातवेकर, संपदा थोरात, संघाचे अधिकारी कर्मचारी व महिला स्वयंसेविका आदी उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.