कावीळसदृश्य आजार रोखण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी उपाययोजना कराव्यात : आमदार राहुल आवडे

कोल्हापूर : कावीळ व कावीळ सदृश्य रोगांची लागण होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात म्हणून आमदार राहुल आवडे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पात्र पाठविले आहे.
त्यांनी पात्रात म्हंटले आहे कि, पंचगंगा नदीच्या तीरावरील काही गावामध्ये कावीळसदृष्य रोगाची लागण झाली असल्याचे समजते. यामुळे सर्वसामान्य जनतेत घाबरहाटीचे वातावरण पसरले आहे. पंचगंगा नदी तीरावरील सर्व गावांनी खबरदारीचा उपाय म्हणून सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आपण जिल्हा स्तरावर काविळीपासून बचाव होण्यासाठी मोहीम सुरु करावी. या अंतर्गत सर्व ग्रामपंचायती, नगरपालिकाना आवश्यक ते आदेश द्यावेत. याचबरोबर आवश्यक उपाययोजना कराव्यात.