खुल्या व्यासपीठावर या, विकासावर बोलू आ. ऋतुराज पाटील यांना आवाहन : शौमीका महाडिक

खुल्या व्यासपीठावर या, विकासावर बोलू आ. ऋतुराज पाटील यांना आवाहन :  शौमीका महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या काही वर्षांपासून कोल्हापुरातील सर्व सत्ता, सर्व महत्त्वाच्या संस्था, महानगरपालिका या काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील, त्यांचे काका पालकमंत्री यांच्याकडेच होत्या. पण इतक्या वर्षात कोल्हापुरात काहीच विकास कामे झालेली नाहीत. रस्ते, पाणी, ड्रेनेज लाईन अशा नागरिकांच्या मूलभूत गरजाही पूर्ण झालेल्या नाहीत. त्यांच्या फलकावरील स्कॅन कोड चा घोळही आता उघड झाला आहे. म्हणूनच विद्यमान आमदार विकास कामांवर बोलत नाहीत. पण तरीही खुल्या व्यासपीठावर या विकासाच्या मुद्द्यावर बोलू, असे जाहीर आव्हान शौमीका महाडिक यांनी दिले.

कोल्हापूर दक्षिण मतदार संघाचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ खेबवडे गावात आयोजित करण्यात आलेल्या निर्धार सभेत त्या बोलत होत्या. यावेळी महायुतीचे खासदार धनंजय महाडिक, मीनाक्षी महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

त्या पुढे म्हणाल्या, आमदार हा नेहमी माणसातला माणूस ओळखणारा असावा. जनतेच्या सुख दुःखात साथ देणारा असावा. तशी ओळख अमल महाडिक यांनी निर्माण केली आहे. आपल्या पक्षाची विचारधारा जपून स्वतःच्या विचारांशी देखील एकनिष्ठ असणाऱ्या अमल महाडिक यांनी महायुती सरकारने बनवलेल्या योजना शेवटच्या घटकापर्यंत अमल महाडिक यांनी पोचवल्या. जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोचवण्याच्या महायुतीच्या विचारधारेचे भान ठेवणाऱ्या अमल महाडिक यांचा विजय नक्की असल्याचा विश्वास शौमीका महाडिक यांनी व्यक्त केला. 

या सभेप्रसंगी विश्वास चौगले, संदीप शिंदे, सागर चौगले, दत्ता चौगले आणि सर्व सहकारी यांनी भाजप महायुती मध्ये प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे स्वागत खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य खेबवडे व महाडिक गटप्रमुख संदीप प्रकाशराव पाटील, सुभाष पाटील, आप्पासाहेब चौगुले, संपत पाटील, विक्रम कांबळे, रणजीत पाटील चुयेकर, अर्चना गुरव, मीनाक्षी महाडिक (काकी) यांनी मनोगत व्यक्त केले

या निर्धार सभेला खेबवडे माजी सरपंच राणी लोहार, प्रताप मगदूम, मा जि प सदस्य संध्याराणी बेडगे, प्रताप पाटील (कावणेकर), शिरोली सरपंच पद्मजा करपे, संदीप पाटील, सुभाष पाटील, चंद्रकांत जाधव, सर्जेराव पाटील, शिवाजी चौगुले, विश्वास चौगुले, विक्रम कांबळे, धीरज मगदूम, शामराव शिंदे, शाहू चव्हाण, अमर चौगुले यांच्यासह खेबवडे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.