खो-खो विभागीय स्पर्धेत शरद पॉलिटेक्ऩिक विजेते

खो-खो विभागीय स्पर्धेत शरद पॉलिटेक्ऩिक विजेते

कोल्हापूर प्रतिनिधी : इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंटस स्पोर्टस असोसिएशनच्या विभागीय खो-खो स्पर्धेत शरद पॉलिटेक्निकच्या संघाने विजेतेपद पटकाविले. स्पर्धेचे आयोजन यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजी,पॉलिटेक्निकने केले होते. स्पर्धेचे उद्घाटन एक्झिक्यटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी केले.

यावेळी बागणे म्हणाले, पॉलिटेक्निकचे विद्यार्थी टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेत असतात. खेळाकडे वेळ देण्याइतपत त्यांच्याकडे वेळ नसतो. तरी आपण सर्व विद्यार्थी खेळात सहभागी झाला आहात, हे कौतुकास्पद आहे. खेळातून चुरस तसेच खिलाडूवृत्ती जागृत होते. त्यातून जीवनात यश मिळविताना त्याचा उपयोग होतो.

खो-खो स्पर्धेत जिल्ह्यातील १४ महाविद्यालयाचे संघ सहभागी झाले होते. यामध्ये शरद पॉलिटेक्निकने विजेते पद मिळविले. तर उपविजेतेपद महादेवराव वांद्रे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, चंदगड यांनी मिळविले.

कबड्डी स्पर्धेत १७ संघ सहभागी झाले होते. यामध्ये अशोकराव माने पॉलिटेक्निकने विजेतेपद तर उपविजेतेपद शासकिय तंत्रनिकेतन, रत्नागिरी यांनी पटकाविले. खो-खो व कबड्डी या दोन्ही स्पर्धेतील विजेते संघाची निवड आंतर विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे.

खो-खो स्पर्धेचे पंच म्हणून कोल्हापूर जिल्हा खो-खो असोसिएशनचे प्रमोद मकोटे व त्यांचे सहकारी तर कबड्डीसाठी पंच म्हणून कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे बाळासो चव्हाण, धनंजय माने-गावडे व सहकारी होते. 

स्पर्धेचे आयोजन क्रिडा विभाग प्रमुख व स्पर्धेचे समन्वयक प्रा. शुभम भरमगोंडा, प्रा. सोनाली पाटील यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे डिन, विभाग प्रमुख, प्रा. मोहसिन मुल्लाणा, प्रा. निरंजन पोतदार, प्रा. बिपिन पाटील, प्रा. प्रविण कर्वे, विनायक रोकडे यांच्यासह क्रिडा कमिटी प्रतिनिधीनी यांचे सहकार्य लाभले.