ACP प्रद्यम्न करणार पुन्हा एकदा CID मध्ये दमदार एन्ट्री ..!

मुंबई - CID मालिका बघणाऱ्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी असून मालिकेत एसीपी प्रद्युम्नच्या मृत्यूमुळे नाराज झालेले प्रेक्षक ही बातमी पाहून नक्कीच आनंदी होतील. एसीपी प्रद्युम्नचा मृत्यू झालेला नसून लवकरच मालिकेत पुन्हा एकदा दमदार एन्ट्री करणार असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेते शिवाजी साटम पुन्हा एकदा मालिकेत कमबॅक करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
CID मालिका निर्माते एसीपी प्रद्युमनच्या पुनरागमनाची योजना आखत आहेत. मालिका चाहत्यांच्या रागामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं बोललं जात आहे. एसीपी प्रद्युमन या व्यक्तीरेखेने प्रेक्षकांची मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. एसीपी हे पात्र शिवाजी साटम हे गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सीआयडीशी त्यांची नाळ जोडली गेली आहे. ‘दया दरवाजा तोड़ दो’ आणि ‘कुछ तो गडबड है दया’ ह्या त्यांच्या डायलॉग्जमुळे मालिका पहायला प्रेक्षकांना हुरूप येत होता. मात्र, मालिका निर्मात्यांनी जेव्हा एसीपी प्रद्युमनच्या हत्येचा ट्रॅ्क दाखवला तेव्हा प्रेक्षकांनी निर्मात्यावर जोरदार टीका केली गेली. मालिकेत शिवाजी साटम म्हणजेच एसीपी प्रद्युमन यांच्या पुनरागमनासाठी एका अनोख्या सीनचा विचार केला जात असल्याचीही चर्चा सध्या मनोरंजन विश्वात सुरू आहे.