HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

जनतेच्या पाठबळावर विजय निश्चित : आ.ऋतुराज पाटील

जनतेच्या पाठबळावर विजय निश्चित : आ.ऋतुराज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या गिरगावमधील पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, महिलासह जनतेचे आशीर्वाद व पाठबळावर माझा विजय निश्चित आहे असा विश्वास आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. 

आमदार ऋतुराज पाटील यांनी सैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरगाव मधील श्री भैरवनाथ मंदिरात दर्शन घेऊन पदयात्रेला प्रारंभ केला. गावातील प्रमुख मार्गावरून पदयात्रा काढण्यात आली. यावेळी आ.पाटील यांचे ठिकठिकाणी उत्साही स्वागत करण्यात आले. 

आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, देशसेवेसाठी गिरगावने दिलेले योगदान अतुलनीय आहे. आजी माजी सैनिकांचे शौर्य आणि कार्य वंदनीय असून आम्ही कायम त्यांच्या ऋणात राहू. महिला, युवक, जेष्ठ नागरीक व विद्यार्थी या सर्वांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. गेल्या पाच वर्षात गावच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणला. या निधीतून विकासात्मक काम गावात झाले आहे. गेली पाच वर्ष कार्यकर्त्यांच्या ताकतीवर चांगले काम केल्याचे समाधान आहे. कार्यकर्त्यांचा विश्वास व  बळ आपल्या पाठीशी कायम राहिल. पदयात्रेला मिळालेला प्रतिसाद हा माझ्या विजयाचा पाया आहे.

पदयात्रेत सरपंच महादेव कांबळे, उपसरपंच उत्तम पाटील,  उत्तम पाटील-नवाळे, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, संभाजी कोंडेकर, राजेंद्र कोंडेकर, चंद्रकांत कुरणे, श्रीकांत बागणे, अनिल म्हेत्रे, अनिल चव्हाण, पांडुरंग पाटील, शशिकांत साळुंखे, रघुनाथ पाटील, राजाराम चव्हाण, दत्ता साळुंखे, सुभाष पाटील, गावातील महादेव तालीम, शिवाजी तालीम, जय हनुमान तालीम, पॉवर ग्रुप, बालगोपाल तालीम, जय शिवराय, द ग्रेट मराठा, जय हिंद, हिंदुस्तान ग्रुप, या मंडळाचे कार्यकर्ते तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.