HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

डी. वाय.पाटील विद्यापीठाची लवकरच ‘ई-कन्टेन्ट’मध्ये भरारी : कुलगुरू डॉ.आर के शर्मा

डी. वाय.पाटील विद्यापीठाची लवकरच ‘ई-कन्टेन्ट’मध्ये भरारी : कुलगुरू डॉ.आर के शर्मा

कोल्हापूर : डी वाय पाटील विद्यापीठामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील आधुनिक बदल आत्मसात करून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहेत. यापुढे विद्यापीठ ‘ई-कन्टेन्ट’ मध्येही भरारी घेईल. येत्या काही वर्षात ‘ई कन्टेन्ट’ निर्मितीमध्ये विद्यापीठात देशात नावलौकिक मिळवेल असा विश्वास डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर आर के शर्मा यांनी व्यक्त केलाय. डी. वाय. पाटील नर्सिंग कॉलेजमध्ये आयोजित "स्वयम ई कन्टेन्ट" कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

डॉ. आर के शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुण्या डॉ. एस. रेणुकादेवी, आयक्यूएसी डायरेक्टर डॉ. शिंपा शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, प्राचार्य डॉ. उमराणी जे. यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ. शर्मा म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शैक्षणिक क्षेत्रात खुप मोठे बदल होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी अभिमत विद्यापीठात अत्याधुनिक ई-कंटेंट सुरू केले जात आहे. यामाध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देणे शक्य होणार आहे. त्यासाठी प्राध्यापकांनाही आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे. ई-कन्टेन्टच्या मदतीने नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धती विकसित करून शैक्षणिक आशय वृद्धीवर भर दिला जात आहे.  

प्रमुख पाहुण्या डॉ. एस. रेणुकादेवी यांनी, द आर्ट ऑफ स्वयम ई कन्टेन्ट या विषयावर मार्गदर्शन केले.ई लर्निंग बरोबरच ई कन्टेन्ट येणाऱ्या काळात अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण ई कन्टेन्ट निर्मितीवर भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी कार्यशाळेच्या आयोजिका प्रा. जानकी शिंदे यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.