HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

मुरगुड येथे साई कॉलनीत खून

मुरगुड येथे साई कॉलनीत खून

मुरगूड (प्रतिनिधी) : शहरातील साई कॉलनीत राहणाऱ्या एका शिक्षकाने कौटुंबिक वादातून शिक्षिका असलेल्या आपल्या पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून तिचा खून केला. आज मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे शहर व परिसरात एकच खळबळ उडाली.घटनेची मुरगूड पोलिसांत नोंद झाली असून या प्रकरणी पोलिसांनी शिक्षक पतीला घरातून ताब्यात घेतले आहे.

पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरच असणाऱ्या साई कॉलनीत शिक्षक परशराम पांडुरंग लोकरे (वय ५३) व शिक्षिका सविता लोकरे (वय ४५) हे आपल्या अपूर्वाई या बंगल्यात एक मुलगा व दोन मुलीसह राहत होते.

परशराम व त्यांची पत्नी सविता यांच्यात कौटुंबिक कारणातून वारंवार वाद होत होते. आज सकाळी देखील चहापाणी सुरु असतानाच या दोघांत वाद सुरु झाला. यावेळी त्यांच्या मुलांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी वाद विकोपाला गेला.यावेळी सविता ह्या भांडी घासण्यासाठी गेल्या असता परशराम यांनी रागाच्या भरात वरवंटा घेऊन धावत जाऊन सविताच्या डोक्यात घातला. डोक्यात वर्मी घाव बसल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या व जागीच ठार झाल्या. सदर घटनेचा तपास मुरगूड पोलीस करत आहेत. 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.