अवचितपीर तालीम शिवाजी पेठ आयोजित कॅरम स्पर्धा संपन्न

अवचितपीर  तालीम शिवाजी पेठ आयोजित कॅरम स्पर्धा संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अवचितपीर तालीम आयोजित कॅरम स्पर्धा शुक्रवारी पार पडली.अतिशय चूरशीच्या पार पडलेल्या या स्पर्धे मध्ये  22 टीमने (डबल बोर्ड )सहभाग घेतला होता. सर्वच सामने अतिशय उत्स्फूर्त पार पडले. दिवसभर सुरु असलेल्या या स्पर्धे मध्ये 1) प्रथम क्रमांक- अमित चव्हाण, विशाल जाधव 2) द्वितीय- पार्थ जाधव, धवल भोसले 3) तृतीय क्रमांक- अजित शिंदे, दीपक माने 4) चतुर्थ क्रमांक -सत्यजित कुऱ्हाडे, चेतन माने यांनी क्रमांक पटकवले. तर स्पर्धेचे पंच म्हणून अजित शिंदे यांनी काम सांभाळले. यावेळी उपस्थित अवचितपीर तालीम अध्यक्ष मंजित किरण माने, उपाध्यक्ष दीपक माने, माजी अध्यक्ष अनिल इंगवले, अजित शिंदे, रणजित पाटील, विशाल जाधव, स्वामी जाधव, अमित चव्हाण, तुषार इंगवले, धवल भोसले,सुहास चव्हाण,पवन माने,अथर्व साळोखे,बाबा पाटील आदि उपस्थित होते.