कोरे अभियांत्रिकीत इशरे मार्फत स्पर्धेचे यशस्वी आयोजन

कोरे अभियांत्रिकीत इशरे मार्फत स्पर्धेचे यशस्वी आयोजन

कोल्हापूर प्रतिनिधी : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी ऑटोनोमस, महाविद्यालयातील मेकॅनिकल विभाग व इशरे,(इंडियन सोसायटी फॉर हीटिंग, रेफ्रिजरेशन अंड एअर कंडिशनिंग) कोल्हापूर विभाग, यांच्यामार्फत वारणानगर येथे क्विझ स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावरती घेण्यात येते येथील स्पर्धेमध्ये पाच राज्यातील मुले उप उपांत्य फेरीसाठी क्विज स्पर्धेत सहभागी झाली होती.

यामध्ये एकूण 20 टीम भाग घेतला. या उप उपांत्य फेरीमधील विजेत्या विद्यार्थ्याचा अंतिम सामना बेंगलोर येथे फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. अंतिम सामन्यांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना सरळ बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. यामध्ये एचव्हीएससी मधील नामांकित कॅरियर, हिताची, ब्लू स्टार, या नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. अशा पद्धतीची स्पर्धा आयोजित करण्याचा मान पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाला मिळालेला आहे. नजीकच्या काळात अशा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचा अंतिम सामना वारणा विद्यापीठात होण्याचा मानस डॉ. विनयरावजी कोरे यांनी व्यक्त केला.

श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, डॉ. विनयरावजी कोरे यांनी स्पर्धेत शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी, डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. बी. टी. साळोखे, अधिष्ठाता, डॉ. एस. एम. पिसे,कविता धनवडे, प्रमोद पुंगावकर, इशरे अध्यक्ष, कोल्हापूर विभाग, अवेस हुसैनी, योगेश गांधी, विजय पाटील, विभाग प्रमुख, डॉ. पी. व्ही. मुळीक, प्रा. जी. एस. कांबळे, समन्वयक, प्रा. ए. एस. चव्हाण उपस्थित होते.

स्पर्धा विजेता: श्रावण माळी , मंदार चत्रे , वालचंद कॉलेज, सांगली,उपविजेता: संदेश भांगे, तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी,वैभव झडगे, शरद इन्स्टिट्यूट.