शिक्षक बँकेमुळे शिक्षकांचे जीवनमान उंचावले : प्रकाश काळोखे
![शिक्षक बँकेमुळे शिक्षकांचे जीवनमान उंचावले : प्रकाश काळोखे](https://majhamaharashtra.in/uploads/images/202502/image_750x_67a713fccc3b5.jpg)
सांगली : शिक्षक बॅकेच्या माध्यमातून जिल्हयातील शिक्षक सभासदांचे जीवनमान उंचावण्यात मोठी मदत झाली आहे . शिक्षक बॅक ही शिक्षकांची कामधेनू आहे. असे प्रतिपादन राज्य पुरस्कार प्राप्त निवृत्त केंद्रप्रमुख प्रकाश काळोखे यांनी केले.
आष्टा येथील सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत प्रजासत्ताक दिनाच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाखाधिकारी माणिक पाटील होते.
यावेळी ते पुढे म्हणाले, शिक्षकांच्या प्रत्येक गरजेसाठी शिक्षक बँक मदतीचा हात देते. शिक्षकांच्या अडीअडचणीच्या वेळी बँकेच्या माध्यमातून होणारी मदत सहज आणि सोपी असते. त्यामुळेच शिक्षकांना ही बँक आपली वाटते.भविष्यात बँकेने सभासदांच्या कल्याणासाठी विविध योजना सातत्याने राबवाव्यात.
यावेळी ज्युनि. ऑफीसर दिपा कर्वे, कॅशियर शंकर शेवडे, सागरआडके ,सुधीर चव्हाण, केदार करोलीकर, आदर्श पाटील ,युवरात जाधव , आशितोष पाटील, सुरज चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते .