HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

सिद्धनेर्ली येथील दलित समाजाचे आंदोलन म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवळ राजकीय स्टंटबाजी

सिद्धनेर्ली येथील दलित समाजाचे आंदोलन म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवळ राजकीय स्टंटबाजी

कागल (प्रतीनिधी) : कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली येथील दलित समाजातील काही कुंटूंबाच्यावतीने जमिनीबाबत उपोषण सुरू आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर केवळ ही राजकीय स्टंटबाजी आहे.  जमीन मालकांनी या जमिनी काढून घेतल्या असे वाटत असेल तर इतकी वर्ष त्यांनी न्यायालयात  दाद का मागितली नाही? आत्ताच निवडणुकीच्या तोंडावर हे उपोषण कोणाच्या सांगण्यावरून ? मागील 25 वर्षे  मा. हसन साहेब मुश्रीफ  मग त्यांनीही या समाज बांधवाना आज पर्यंत न्याय काय मिळवून दिला नाही? 

या एका कुटुंबाच्या प्रश्नावर संपूर्ण दलीत बांधवांवर  अत्याचार झालेचे  ते गल्ली बोळात सांगत का सुटले आहेत? ज्यांच्या पुढाकाराने हे उपोषण होत आहे, त्याचेवर कागल पोलिस स्टेशन मध्ये भानामती चा गुन्हा दाखल झाला आहे,हे मुश्रीफ याना माहित नाही का?मग भानामती करणाऱ्याला ते पाठीशी  का घालत आहेत. अशी विचारणा सिद्धनेर्ली येथीलच  काही दलित समाज बांधवांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे केली आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे, मुळात ही जमीन राजे समरजितसिंह घाटगे यांच्या नावावर नाही. समरजीत सिंह घाटगे यांना दलित समाजाचा मिळत असलेला वाढता पाठिंबा म्हणून राजकीय सूटबुद्धीने त्यांचे नाव यामध्ये गुंतवले आहे.अशा स्टंटगिरीला कागलच्या जनतेने भीक घालू नये. 

 सदरची जमीन कागल संस्थांनचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत पिराजीराव घाटगे यांनी  ही जमीन  या   कुटुंबीयांना  गवती कुरुणातील जनावरांना चारा मिळावा व पशुपालनातून दलित समाजाचा उदरनिर्वाह व्हावा,यासाठी कसावयास दिली होती हेच आमच्यावर मोठे उपकार आहेत.सिद्धनेर्ली येथील संपूर्ण दलित समाजाचा संबध या घटनेशी संबध येत नाही.

 राजे समरर्जीतसिंह घाटगे  यांनी शाहू ग्रुप मधील विविध संस्थांमध्ये दलित समाजातील तरुणांना नोकऱ्या, डिक्की व राजे बँकेच्या छत्रपती शाहू महाराज कर्ज योजनेच्या माध्यमातून उद्योग व्यवसायात अनेक तरुणांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभे केले आहे.

दलित समाज शरद पवार साहेब,उद्धव ठाकरे,व राहुल गांधी यांच्या महविकस आघाडीचा पुरस्करता असून तो समरजितसिंह  घाटगे यांच्या पाठीशी उभा राहिला आहे.याच धास्तीने त्यांनी उपोषणाचा उपद्व्याप केला आहे.

 ....हा जाब मंत्री मुश्रीफ यांना विचारावा 

या घटनेचा संदर्भ घेत मंत्री मुश्रीफ म्हणतात.या लोकांना आपण ५.५ एक्कर जमीन विकत घेऊन देऊ  असे वृत्तपत्रातून वाचले. मग वीस वर्षांपूर्वी  या समाजातील   ४० युवकांना नोकरी देतो अशी घोषणा केली होती त्याचे पुढे काय झाले ?

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.