अलमट्टी जलाशयातून 3 लाख क्युसेक विसर्ग

अलमट्टी जलाशयातून 3 लाख क्युसेक विसर्ग

कोल्हापूर - बागलकोट जिल्ह्यातील अलमट्टी येथील लाल बहादूर शास्त्री जलाशयातून 2.75 लाख क्युसेक वरून आता 3 लाख क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात आलाय. अलमट्टीच्या विसर्गात वाढ झाल्यानं बॅकवॉटरमधील पाण्याची पातळी कमी होईल आणि नदीच्या वरच्या भागात पूर येण्याची शक्यता कमी होईल. याबाबतची माहिती कर्नाटक आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण समिती यांच्याकडून देण्यात आलीय.