करवीर सरपंच पदाची मंगळवारी आरक्षण सोडत

करवीर सरपंच पदाची मंगळवारी आरक्षण सोडत

कोल्हापूर (प्रतिनिधी) - करवीर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या सन 2025 ते 2030 या कालावधीकरीता आरक्षण सोडत मंगळवार 1 ऑगस्ट  रोजी सकाळी 11 वाजता बहुद्देशीय हॉल, रमणमळा, कसबा बावडा, कोल्हापूर येथे काढण्यात येणार आहे.

या आरक्षणसाठी इच्छुकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करवीरचे तहसिलदार स्वप्निल रावडे यांनी केले आहे.