गुंडेवाडी गावात नागपंचमीची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा कायम

गुंडेवाडी गावात नागपंचमीची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा कायम
नागपंचमीची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा कायम
गुंडेवाडी गावात नागपंचमीची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा कायम

अशोक मासाळ / सांगली प्रतिनिधी 

मिरज तालुक्यातील गुंडेवाडी गावामध्ये नागपंचमीची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा कायम राखण्याचे काम अशोक केरु बने आजही करत आहेत.

नागपंचमी हा श्रावण महिन्यातील पहिलाच सण आहे. या सणा दिवशी प्रत्येकाच्या घरी नागदेवतेची पूजा केली जाते व नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले होते. त्या दिवसापासून नागाची पूजा करण्यास प्रारंभ झाला आहे.

मिरज तालुक्यातील गुंडेवाडी गावामध्ये अशोक केरू बने हे एक ते दीड फुटी नागोबाची चिखलाची मूर्ती तयार करतात आणि ती मूर्ती विविध फुलांच्या साह्याने सजवली जाते. त्यामुळे ती मूर्ती अधिकच आकर्षित व सुंदर दिसते. प्रथम त्या मूर्तीचे पूजन स्वतः च्या घरामध्ये केले जाते त्यानंतर गावामध्ये त्या नागदेवतेची पूजा करत असतात.

त्यानंतर त्या नागदेवतेला वाजत गाजत मिरवणूक काढत गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नागोबाच्या मंदिरात ती चिखलाची मूर्ती ठेवली जाते व गावातील सर्व जाती धर्मातील स्त्रिया दिवसभर नागदेवतेची पूजा करत असतात. अशाप्रकारे ही धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा कायम राखण्याचे काम केले जाते.